उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

 
Osmanabad police

लोहारा : लोहारा ग्रामस्थ- शफीक आयुब गवंडी हे दि. 21- 22.11.2021 दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 90 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शफीक गवंडी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : ज्ञानेश्वर रावसाहेब उंदरे, रा. जिजाऊनगर, वाशी हे कुटूंबीयांसह दि. 20.11.2021 रोजी रात्री घरात झोपलेले असतांना त्यांच्या स्वयंपाक खोलीचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने 03.15 वा. सु. तोडून घरात प्रवेश केला. ज्ञानेश्वर यांसह त्यांच्या कुटूंबीयांना घरात कोणीतरी शिरल्याची चाहुल लागल्याने त्यांनी स्वयंपाक खोलीत धाव घेतली. यावेळी घरात शिरलेल्या चार अनोळखी पुरुषांनी त्यांना काठीने मारहान करुन ज्ञानेश्वर यांच्या पत्नी व आईच्या अंगावरील तसेच घरातील कपाटातील असे एकुण 190 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर उंदरे यांनी दि. 22 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : नागेश बळीराम घोगरे, रा. भुम यांसह त्यांच्या मित्रांनी शहरातील नगर रस्त्यालगत असलेल्या एका शेतात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या क्रिडांगणावरील ध्वनीवर्धक यंत्रणेचा ऍम्लीफायर, एलपीजी  टाकी, पाण्याचे दोन जार, खेळाडूंच्या जेवणाकरीता आनलेले तूर, मसूर व मूग डाळी असे एकुण 22,500 ₹ चे साहित्य दि. 21- 22.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या नागेश घोगरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : देवकुरळी, ता. तुळजापूर येथील मनोज मारुती जाधव यांच्या घराचा कडी- कोयंडा दि. 21.11.2021 रोजी 10.00 ते 18.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील कपाटातील 68,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या मनोज जाधव यांनी दि. 22 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : एकुरगावाडी, ता. उमरगा येथील व्यंकट माणिक शिंदे यांच्या शेतातील शेडसमोरील मुऱ्हा जातीची म्हैस दि. 21- 22.11.2021 दरम्यानच्या रात्री लातूर येथील इस्माईल दस्तगीर शेख हे पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 एजे 1748 मधून चोरुन नेत असल्याचे म्हैस मालक व्यंकट शिंदे यांना दिसले. यावेळी त्यांनी पिकअप वाहन अडवले असता इस्माईल याने पिकअप चालक- समाधान भोसले, रा. माडज यांना लघुशंकेस जाण्याचा बहाना सांगून ते तेथून पसार झाले. अशा मजकुराच्या व्यंकट शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन इस्माईल शेख विरुध्द भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web