धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे पाच गुन्हे दाखल 

धाराशिव, भूम, ढोकी, बेंबळी,  शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद 
 
crime

धाराशिव  - आरोपी नामे-1)दादा कांबळे, 2) नाना कांबळे दोघे रा. बालाजी नगर  उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.12.09.2023 रोजी 18.00 वा. सु. बालाजी नगर उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे-राहुल दिपक काळे, वय 18 वर्षे, रा. बालाजी नगर उस्मानाबाद ता. जि.उस्मानाबाद हे घरासमोर बसलेले असताना नमुद आरोपी हे दारु पिवून आले. व काही एक कारण नसताना फिर्यादीस शिवीगाळ करुन  लाथाबुक्यांनी व दगडाने डोक्यात जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी राहुल काळे यांनी दि.14.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भूम  :आरोपी नामे-1)गणेश विठ्ठल कसबे, 2) विठ्ठल श्रावण कसबे दोघे रा. चिंचपूर ढगे ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी राहते घराच्या जागेच्या वादाचे कारणावरुन  दि. 13.09.2023 रोजी 16.00 वा. सु. चिंचपुर ढगे येथे  फिर्यादी नामे- येडबा सुभाष कसबे, वय 35 वर्षे, रा. चिंचपुर ढगे, ता. भुम जि. उस्मानाबाद  यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन डावे पायाचे नडगीवर कुह्राड मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी येडबा कसबे यांनी दि.14.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी :आरोपी नामे-1) सलाम समद पटेल, 2) सोहेल सलाम पटेल, 3) कमाल सलाम पटेल रा. पळसप, ता. जि. उस्मानाबाद यांनी आरोपी यांचेवर पुर्वी कोर्टात दाखल असलेली केस मागे घेण्याचे कारणावरुन  दि. 10.09.2023 रोजी 19.30 वा. सु. पळसप येथील ग्रामपंचायत समोर फिर्यादी नामे-सिध्दीकी गेबु शेख, वय 53 वर्षे, रा. पळसप ता. जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपीतांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान करुन फिर्यादी, त्यांचा मुलगा  समीर शेख तसेच फिर्यादीचा भाउ शौकत शेख यांना चाकु व सुरीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तुम्ही जर पाठीमागील केस कोर्टातुन मागे नाही घेतली तर तुम्हास जिवे मारीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सिध्दीकी गेबु शेख यांनी दि.14.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  :आरोपी नामे-1) बापुराव महादेव लोखंडे, 2) सोमनाथ महादेव लोखंडे, 3) सुनिता महादेव उर्फ बाबासाहेब लोखंडे, 4) द्रोपदी नरहरी लोखंडे सर्व रा. करजखेडा ता. जि. उस्मानाबाद यांनी शेतीच्या वादाचे कारणावरुन फिर्यादी  नामे- मधुकर नरहरी लोंखडे, वय 79 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 14.09.2023 रोजी 17.30 वा. सु. फिर्यादीचे घरासमोर करजखेडा येथे नमुद आरोपीतांनी संगणमत करुन मागील भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची सुन माधुरी लोखंडे या त्यांचे बचावास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन डावा कान ओढून जखमी केले. व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी मधुकर लोखंडे यांनी दि.14.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण  :आरोपी नामे-1) शंकर अमृत मुंढे,2) समाधान अमृत मुंढे, रा. गोविंदपूर ता. कळंब अनोळखी 1 व्यक्ती यांनी दि. 13.09.2023 रोजी 19.00 वा. सु. फिर्यादी नामे- शंभु ज्ञानोबा गोरे, वय 29 वर्षे, रा. नायगाव, ता. कळंब जि. उस्मानाबाद हे गोविंदपूर शिवारातील गोविंदपूर ते निपाणी पाटी रोड ने जात असताना विटभट्टी जवळ यांचे मोटरसायकलला नमुद आरोपीनी त्यांची मोटरसायकल आडवी लावून मोटरसायकलचे हेल्मेट काढून हातात घेवून फिर्यादीचे डोक्यात मारुन जखमी केले व लाथाबुक्यांनी मारहाण करुन खंडणी मागीतली व जर पैसे नाही दिले तर जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचे खिशातील 2,000₹ काढून घेतले व “ तु जर पोलीस स्टेशन ला तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही” असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी शंभु गोरे यांनी दि.14.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-341, 327, 384, 324, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.-

From around the web