दाऊतपूर येथे दोन गटांत हाणामारी 

 
Osmanabad police

ढोकी : दाउतपूर, ता. उस्मानाबाद येथील ठवरे कुटूंबातील पोपट, बापु, रंजना यांसह अण्णा पांढरे यांच्या गटाचा गावकरी थोरात कुटूंबातील विशाल, अमोल, संदिपान, शिवाजी, संतोष, तानाजी, जयश्री, सुनंदा यांच्या गटाशी कौटुंबीक कारणावरुन दि. 20 ऑक्टोबर रोजी 20.30 वा. सु. राहत्या गल्लीत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, चाकु, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पोपट ठवरे व विशाल थोरात यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 323, 504, 143, 147, 148, 149 अंतर्गत परस्परविरोधी 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 मुरुम  : अचलेर, ता. लोहारा येथील लक्ष्मीकांत अमृत पाटील, उमाजी, मल्लीनाथ, सिध्दराम, अशोक पाटील यांच्या गटाचा गावातील नातेवाईक- दत्तात्रय मलाप्पा पाटील, केदार, प्रतिक, भिमाशंकर, आप्पासाहेब, राजेंद्र, विजय, गिरीष पाटील यांचा गटाशी शेतजमीन मालकी हक्कावरुन दि. 21 ऑक्टोबर रोजी 12.00 वा. सु. अचलेर शिवारात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, कोयता, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लक्ष्मीकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत परस्परविरोधी 2 गुन्हे नोंदवले आहेत.


हॉटेलमध्ये अवैधरित्या घरगुती इंधन टाकी वापरणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा  : कलीमखॉन करीमखॉन पठाण, रा. परंडा हे दि. 21 ऑक्टोबर रोजी 12.00 वा. सु. छ. शिवाजी महाराज चौक, परंडा येथील त्यांच्या अलंकार हॉटेलमध्ये व्यावसाईक इंधन टाकी न वापरता घरगुती इंधनच्या 2 टाक्या वापरत असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन परंडा पो.ठा. चे पोहेकॉ- दिलीप पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अत्यावश्यक वस्तु अधिनियम कलम- 3, 7 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लैंगीक छळ

उस्मानाबाद  : परजिल्ह्यातील एका तरुणाने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका 23 वर्षीय तरुणीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून तीच्या सोबत ऑगस्ट 2021 पासून वेळोवेळी लैंगीक संबंध प्रस्थापित केले. त्या तरुणीने त्याच्याशी लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने दि. 21 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
                                                                                                           

                                                                                     

From around the web