तुळजापूरच्या जवाहर सिनेमागृहात हाणामारी 

 
Osmanabad police

तुळजापूर  : मंकावती गल्ली, तुळजापूर येथील सुयेश राजेश मलबा व दत्ता राउत हे दि. 17.12.2021 रोजी 22.30 वा. सु. तुळजापूर येथील ‘जवाहर सिनेमागृह’ येथे होते. यावेळी सुयेश यांनी तिकीटाचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन सिनेमागृहातील साहिल सुनिल साठे, नागेश लोंढे, कुमार कांबळे यांसह एक पुरुष अशा चौघांनी सुयेश यांसह दत्ता यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच सुयेश यांच्या कंबरेवर लोखंडी खुर्ची मारल्याने त्यांच्या कंबरेचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या सुयेश मलबा यांनी दि. 19 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : डोमगाव, ता. परंडा येथील किरण भारत शिंदे हे दि. 18.12.2021 रोजी 21.00 वा. सु. डोमगाव क्र.2 येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी ग्रामस्थ- कमलेश बाळासाहेब पाटील, बालाजी हंबीरराव मिस्कीन यांनी किरण शिंदे यांना मो.सा. थांबवण्यास सांगूण जुना वाद उकरुन काढून किरण यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच काहीतीर धारदार हत्याराने उजव्या हातावर वार करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या किरण शिंदे यांनी दि. 19 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                     

From around the web