कळंब तालुक्यात मोटारसायकल अपघातात वृद्ध महिला जखमी 

 
crime

कळंब  : जखमी नामे-सावित्राबाई, बाजीराव पवार, वय 75 वर्षे, रा. शेळकाधानोरा, ता. कळंब जि. धाराशिव  या दि.10.09.2023 रोजी 07.30 वा. सु. शेळकाधानोरा ते मोहा जाणारे रोडच्या कडेला शेळका धानोरा शिवार  येथे पायी जात होत्या. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 24 पी 1935 चा चालक  सय्यद महेबुबपाशा तांबोळी, रा शास्त्री नगर, पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून सावित्राबाई बाजीराव पवार यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नंदाबाई अप्पा पवार, वय 46 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.17.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह  मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

येरमाळा : 1) रमेश बाबुराव कांबळे, वय 35 वर्षे रा. रत्नापूर ता. कळंब, जि. धाराशिव  हे  दि.17.08.2023 रोजी 20.10 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 जी. 8217 हि मदर्याकाचे सेवन करुन आरडाओरडा करुन शिवीगाळ करुन सार्वजनिक  शांततेचा भंग करत असताना मिळुन आला. नमुद चालकांनी मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे नमूद व्यक्तीविरुध्द  गुन्हा नोंदवला आहे.

शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 16.09.2023 रोजी 21.40 वा. सु. तुळजापूर पो.ठा. हद्दीत काक्रंबावाडी गावातील मुख्‌य चौकामधून रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना काक्रंबावाडी ता. तुळजापूर जि.धाराशिव येथील- लहु सुनिल कोळेकर, वय 33 वर्षे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे लोखंडी धारदार दोन तलवारी बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील त्या दोन लोखंडी तलवारी जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

           

                                                  

From around the web