तुळजापूर, मुरूम, ढोकी येथे हाणामारी , चार जखमी 

 
crime

तुळजापूर  : आरोपी नामे-1) विष्णू महादेव काळे,2)बाबा विष्णु काळे, 3) शहाजी विषणु काळे, 4) उमाबाई अरुण शिंदे, 5) मिना शहाजी काळे, 6) उषाबाई बाबा काळे सर्व रा. कचराकोंडी तुळजापूर ता. तुळजापूर  जि. उस्मानाबाद यांनी  दि.28.07.2023 रोजी 15.30 वा. सु.हॉटेल उदय समोर तुळजापूर येथे फिर्यादी नामे आलकाबाई आप्पा पवार, वय 35 वर्षे रा. डिकमल पारधी वस्ती, तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना तुळजाभवानी मंदीरासमोर फुग्याचे दुकान लावायचे सहा लाख रुपये द्या असे म्हणुन गैरकायद्याची मंडळी जमवून आलकाबाई व तिचे नातेवाईकास मारहाण केली. शहाजी काळे यांनी आलकाबाई यांची भावजय लताबाई काळे यांना चाकूने खांद्यावर मारुन जखमी केले. तसेच इतर नातेवाईक यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या आलकाबाई पवार यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 384, 143, 147, 148, 149, 323  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 

मुरुम  : आरोपी नामे-1) सचिन धनराज गिरीबा 2) नितीन धनराज गिरीबा, 3) प्रताप धनराज गिरीबा, 4)शेखर शिवराज गिरीबा, 5)अमर शिवाजी गिरीबा 6) रमेश उर्फ सोन्या चिलोबा सर्व रा. मुरुम ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी मागील भांडणाचे कारणावरुन दि.27.07.2023 रोजी सायंकाळी 21.30 वा. सु. माहेश्वरी स्वीट मार्ट समोर रोडवर, बस्वेश्वर चौक मुरुम येथे फिर्यादी नामे-पवन देवानंद फुगटे, वय 17 वर्षे रा. किसान चौक, मुरुम ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना व त्यांचा मित्र सुदर्शन अवताडे या दोघांना गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाकडी स्टम्पने डोक्यात मारुन जखमी केले. व काठीनेव हंटरने मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पवन फुगटे यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : आरोपी नामे-1) सुदर्शन हाणमंत अवताडे,2) पवन देवानंद फुगाटे 3) स्वप्नील मधुकर जाधव, 4) राम सतरे सर्व रा. किसान चौक, मुरुम ता. उमरगा  जि. उस्मानाबाद यांनी मागील भांडणाचे कारणावरुन दि.27.07.2023 रोजी 21.30 वा. सु. माहेश्वरी स्वीट मार्ट समोर रोडवर बस्वेश्वर चौक मुरुम येथे फिर्यादी नामे सचिन धनराज गिरीबा, वय 26 वर्षे रा. टिळक चौक, मुरुम, ता. उमरगा  जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सचिन गिरीबा यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : आरोपी नामे-1) बंडू गोवर्धन भांगे, रा. दाउतपूर ता. जि. उस्मानाबाद यांनी मागील भांडणाचे कारणावरुन दि.17.07.2023 रोजी 22.30 वा. सु. माहेश्वरी पाण्याचे टाकीजवळ दाउतपूर येथे फिर्यादी नामे राहुल अंकुश भांगे, वय 31 वर्षे रा. दाउतपूर ता. जि. उस्मानाबाद यांना पाठीमागून येवून बंडू भांगे यांनी काठीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या राहुल भांगे यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web