उमरगा तालुक्यात दोन ठिकाणी हाणामारी 

 
crime

उमरगा  : आरोपी नामे- 1)जिवन ऋषीकेश सोनकांबळे, 2)पंचशिला जिवन सोनकांबळे, 3) विद्यासागर जिवन सोनकांबळे सर्व रा. जकेकुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन फिर्यादी नामे- वनिता मोहन सोनकांबळे, वय 50 वर्षे, रा. जकेकुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना दि.08.09.2023 रोजी 07.00 वा. सु. त्यांचे घरासमोर जकेकुर येथे शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण केली. कुह्राडीने उलट्या बाजूचे तुंब्याने डावे हातावर मारुन गंभीर जखमी करुन डावा हात फॅक्चर केली.तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी वनिता सोनकांबळे यांनी दि.08.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  325, 504,506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : आरोपी नामे-1)सुनिल झंपले, 2) प्रदिप झंपले, 3) दत्तात्रय झंपले, 4) सुभाष झंपले सर्व रा. मुळज, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी घराचे गिलाव्याची वाळू पत्रयावर पडल्याचे कारणावरुन फिर्यादी नामे- विलास किसन झंपले, वय 43 वर्षे, रा. मुळज ता. उमरगा जि. उस्मानाबाद  यांना दि.07.08.2023 रोजी 16.30 वा. सु. फिर्यादी यांचे घरासमोर मुळज येथे नमुद आरोपीतांनी संगणमत करुन घराचे गिलावृयाचे वाळू आमचे पत्रयावर का पडू दिली असे म्हणून फिर्यादी व त्यांचे वडील- किसन झंपले, चुलता- बाबुराव झंपले, चुलत भाउ-प्रकाश झंपले यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, कत्तीचे मुठीने मारहान करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी विलास झंपले यांनी दि.08.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web