धाराशिव आणि नळदुर्ग येथे हाणामारी 

 
crime

धाराशिव : आरोपी नामे-1) राकेश जगदीश गायकवाड, 2) स्वप्नील शिंगाडे,3) योगेश जगदीश गायकवाड, 4) सुरेखा जगदीश गायकवाड सर्व रा. भिमनगर उस्मानाबाद यांनी मोटरसायकल समोर आडवे येण्याचे कारणावरुन  दि.13.08.2023 रोजी 10.30 वा. सु.भिमनगर येथे फिर्यादी नामे- आनंद ऊर्फ बंटी राजेंद्र सोनवणे, वय 24 वर्षे, रा. भिमनगर, उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने व चाकुने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आनंद सोनवणे यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323, 504, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : आरोपी नामे-1) विजय पोपट वाघमारे, 2) अजय पोपट वाघमारे, 3) पोपट वाघमारे,4) संतोष धावणे सर्व रा. भिमनगर उस्मानाबाद यांनी कोर्टातील केस मागे घेण्याचे कारणावरुन  दि.14.08.2023 रोजी 12.00 वा. सु.क्रांतीचौक पुढे सिंधुबाई सरवदे यांचे घरासमोर फिर्यादी नामे- नितीन सुनिल कांबळे, वय 34 वर्षे, रा. भिमनगर, उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नितीन कांबळे यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग  : जुन्या भांडणाच्या कारणावरुन काटगाव, ता. तुळजापूर उस्मानाबाद येथील- बालाजी सोमनाथ ईरागोटे, वय 43 वर्षे  यांना दि. 13.08.2023 रोजी 19.00 वा. सु. काटगाव ता. तुळजापूर येथे वडर गल्ली येथे आरोपी नामे-1) प्रविण राम ईटकर, 2) राम गंगाधर ईटकर, वय 18 वर्षे, 3) गंगाधर ईटकर,4) राम गंगाधर ईटकर, 5)तानाजी अंबादास ईटकर यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने प्रविण ईटकर यांनी त्याचे हातातील चाकुने गावकरी आकाश ईटकर यांचे पोटात, पाठीत, डावे मांडीवर, पाठीमागील बाजूस मारुन गंभीर जखमी केले. तसेच बालाजी ईरागोटे हे आकाश यांचे बचावास आले असता त्यासही दिपक ईटकर यांनी चाकुने डोक्यात डावे बाजूस मारुन जखमी केले.गंगाधर ईटकर, राम ईटकर तानाजी ईटकर यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली अशा मजकुराच्या बालाजी ईरागोटे यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : आरोपी नामे-1) भिमा लक्ष्मण इटकर, 2) आकाश भिमा इटकर, 3) नितीन शामराव इरागोटे,4)विकास शामराव इटकर, 5) नितीन शामराव इटकर,6) शिवाजी लक्ष्मण इटकर,7) बालाजी सोमनाथ इरागोटे, 8) सोमनाथ बालाजी इरागोटे,9) विजय शिवाजी इटकर, 10) शामराव लक्ष्मण इटकर सर्व रा. काटगाव ता.  तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.13.08.2023 रोजी 19.00 ते 19.30 वा. सु.काटगाव येथे फिर्यादी नामे- गंगाधर अंबादास ईटकर, वय 46 वर्षे, रा. काटगाव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने फिर्यादीस व पुतण्यास मारहाण करुन जखमी केले. गंगाधर यांचा भाउ राम इटकर हे त्यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन मारहान केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गंगाधर इटकर यांनी दि.14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web