ठेवीदारांची फसवणूक , वसंतदादा बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव : “वसंतदादा नागरी सहकारी बॅक मर्या” उस्मानाबाद शिवाजी चौक उस्मानाबाद चे तत्कालीन चेअरमन, तत्कालीन संचालक मंडळ व बॅकेतील तत्कालीन कर्मचारी यांनी दि.03.08.2011 ते 17.07.2019 दरम्यान “वसंतदादा नागरी सहकारी बॅक मर्या” उस्मानाबाद शिवाजी चौक उस्मानाबाद येथे कर्जासाठी पुरेशे तारण न घेता बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करुन त्या कर्जाच्या रकमा चेअरमन व तृयांचे नातेवाईक यांच्या फायद्यासाठी त्यांचे स्वत:चे खात्यावर घेवून स्वत:च साठी वापरल्या तसेच कर्ज वाटपाची वसुलीही करण्यात आलेली नाही.
तसेच प्रभात सहकारी पतपेढी मर्यादीत उस्मानाबाद यांना मुदत ठेवीवर जास्त व्याजाचे अमिष दाखवून ठेवीची मुदत पुर्ण होवुन देखील मुदत ठेवीची 1,81,00,000₹ असे एकुण 2,31,68,472 ₹ फिर्यादी नामे- विनोद विठ्ठल वडगावकर, वय 44 वर्षे धंदा- शाखा व्यवस्थापक प्रभात सहकारी पतपेढी मर्या, उस्मानाबाद रा. समर्थ नगर, उस्मानाबाद यांची व इतर ठेवीदारांचा विश्वासघात करुन फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी विनोद वडगावकर यांनी दि.27.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 सह महाराष्ट्र ठेवीदाररंचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याचा व्याप्ती व फसवणूक रक्कम जास्त असल्याने सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद यांचे कडे देण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोनि श्री. शेजाळ, आर्थिक, गुन्हे शाखा, उस्मानाबाद हे करीत आहे.