उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून फरार झालेला आरोपी भिवंडी येथून ताब्यात

 
S

बेंबळी  : बेंबळी पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात  अटक केलेला आरोपी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून फरार झाला होता. या आरोपीस  भिवंडी येथून ताब्यात घेण्यात पोलिसाना यश आले आहे. 

सुंभा, ता. उस्मानाबाद येथील अजय व सुनिल श्रावण शिंदे उर्फ काळ्या, या दोघा भावांस बेंबळी पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात दि. 16.01.2022 रोजी न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) ठेवण्यापुर्वी त्यांची उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात 13.45 वा. प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. यावेळी पोलीसांनी सुनिलची स्वाक्षरी व अंगुलीमुद्रा घेण्यास त्याची हातकडी काढली असता तो पोलीसाच्या हातातून आपला हात झटका देउन सोडवून फरार झाला होता. यावरुन त्यांच्याविरुध्द उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 224 अंतर्गत गु.क्र. 12 / 2022 नोंदवण्यात आला आहे.

सुंभा, ता. उस्मानाबाद येथील अजय व सुनिल श्रावण शिंदे उर्फ काळ्या, या दोघा भावांस बेंबळी पोलीसांनी घरफोडीच्या गुन्हा क्रमांक- 210/ 2021 मध्ये अटक करुन उस्मानाबाद न्यायालयात दि. 16.01.2022 रोजी सादर केले होते. त्यांस न्यायालयीन कोठडीकामी उस्मानाबाद कारागृहात ठेवण्याचा आदेश झाल्याने कारागृहात भरती करण्यापुर्वी त्यांची उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात 13.45 वा. प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. यावेळी सुनिलच्या स्वाक्षरी व अंगुलीमुद्रेचा ठसा घेण्याकामी त्याची हातकडी पोलीसांनी काढली असता तो पोलीस हेडकॉन्स्टेबल- अभिमन्यु घोडके यांच्या हातातून आपला हात झटका देउन सोडवून फरार झाला होता. 

            यावर बेंबळी पो.ठा. चे प्रभारी अधिकारी मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्यासह पोहेकॉ-  मिसाळ, पोना- सदावर्ते यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील तांत्रीक विश्लेषन विभागाच्या मदतीने गतीमान तपास केला. यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने त्यास आज दि. 22 जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून ताब्यात घेतले. यावेळी ढोकी पो.ठा. गु.नों.क्र. 231 / 2021 भा.दं.सं. कलम- 307 मध्यील पाहिजे आरोपी-  श्रावण जमनाशा शिंदे हा त्याच्यासोबत मिळुन आल्याने पथकाने त्यासही ताब्यात घेतलेआहे.

From around the web