धाराशिवमध्ये अवैध गोवंशीय जनावराच्या कातडीची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

धाराशिव : धाराशिव  शहर पोलीस ठाण्याचे पथक दि. 25.06.2023 रोजी 19.20 वा.सु. पो.ठा. हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान  वैरागनाका येथे नाकाबंदी पॉईंट चेक करण्यासाठी आले असता  19.30 वा. सु.  भिमनगर रोडवरुन एक आयशर टेम्पो क्र. एम.एच. 45 ए एफ 3210 येत असताना पथकास दिसल्याने पथकाने त्यास थांबण्यास सागिंतले. पथकाने संशयावरून चालकास विचारपुस केली असता त्याने आपले नाव- इलाही महमंद शेख, वय 65 वर्षे रा. शनिवार पेठ सोलापूर असे सागिंतले.

 टेम्पोतून दुर्गंधयुक्त पाणी गळत असल्याने पथकाने संशयावरून टेम्पोचे पाठीमागे हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय जनावराची कातडी दिसून आली. यावर पोलीसांनी नमूद टेम्पो चालक- इलाही शेख यास त्या कातडी वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 4,00,000 ₹ किंमतीच्या नमूद टेम्पोसह त्यातील अंदाजे 18,000 ₹ किंमतीचे सुमारे 90 गोवंशीय जनावरांच्या कातडी जप्त केल्या. या प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार- अमर सय्यद यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक,  अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- श्री. उस्मान शेख, पोलीस उप निरीक्षक श्री. जाधव, सपोफौ- करंडे, पोलीस अमंलदार- तिळगुळे, चव्हाण,आडगळे यांच्या पथकाने केली आहे.  


अवैध जनावराची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

लोहारा : लोहारा पोलीसांनी दि.25.06.2023 रोजी 15.00 वा. सु. लोहारा पो.ठा. हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान यावेळी गुबाळ, ता. औसा येथील- सज्जाक लतिफ पठाण हे बसस्थानक लोहारा समोर रोडवर पिकअप क्र एमएच 25 पी 4441 या मध्ये गोवंशीय जणावरे भरुन म्यांना कुठल्याही प्रकारचे चारा व पाण्याची व्यवस्था न करता जनावरे ही कत्तलीच्या उद्देशाने घेवून जात असताना लोहारा पोठा चे पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र प्राणी छ. प्र. अधि कलम 5(अ) (1) 5(अ) (2), 5 (ब), 9, सह प्राण्यांना क्रुरपणे वागविण्यास प्रतिबंद अधि. कलम 11 (घ)(ड),(च) अंतर्गत लोहारा पोठा गुन्हा नोंदवला आहे.

From around the web