उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

परंडा :  ढग प्रिंपी येथील गावकरी असणारे पांडुरंग माणीक व्यवहारे व राजेंद्र शिवाजी कदम या दोन्ही कुटंुबातील जुना वाद दिनांक 25 मार्च रोजी 09.00 वा  पुन्हा उफाळुन आला यात दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस लाथा बुक्यांनी , दगडाने मारहाण करुन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या दोन्ही कुटुंबीयांनी  दिलेल्या परस्पर विरोधी प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,504,506,34 अंतर्गत गुन्हे नोंदवले  आहेत.

तामलवाडी  : मसला खुर्द येथील सहदेव कांबळे व अशोक घोडके या दोन्ही कुटुंबातील सदस्यांचा दिनांक 25 मार्च रोजी 06.00 वा गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा टाकीजवळ पाणी भरण्यावरुन वाद  झाला. यात दोन्ही कुटुंबीयांनी  परस्पर विरोधी कुटुंबीयांस शिवीगाळ  करुन व ठार मारण्याची धमकी देवुन लाथा बुक्यांनी, दगडाने, गजाने मारहाण करुन केली.अशा मजकुराच्या दोन्ही कुटुंबीयांनी  दिलेल्या परस्पर विरोधी प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 307, 324,504,506,34 अंतर्गत गुन्हे नोंदवले  आहेत.

 जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 
 

तामलवाडी : जळकोटवाडी येथील गट क्रमांक 37 मधील सोमनाथ बोबडे यांच्या शेतातील जलगंगा विद्युत उपसा पंपासह  त्याची  200 मीटर वायर व एक पाणबुडी विद्युत पंप दिनांक 23-24 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या  सोमनाथ बोबडे यांनी दिनांक 25 मार्च रोजी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर ; येथील उर्मीला जाधव या दिनांक 25 मार्च रोजी 12.30 वा शहरातील एका मंगल कार्यालयात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स उघडुन आतील स्मार्ट फोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या  प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web