उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

नळदुर्ग  : नंदगाव, ता. तुळजापूर येथील परमेश्वर विरसंगप्पा बशेट्टी, वय 79 वर्षे हे दि. 20 मे रोजी 11.30 वा. सु. बस स्थानक, नळदुर्ग येथील बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सदऱ्याच्या खिशातील 10,000 ₹ रक्कम परमेश्वर यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या परमेश्वर बशेट्टी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
तुळजापूर  : मुक्तेश्वरी नगर, ता. सोलापूर (उत्तर) येथील अर्चना संजय पवार, वय 30 वर्षे या दि. 20 मे रोजी 12.30 वा. सु. जुने बस स्थानक, तुळजापूर येथील बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शिवीची चैन अर्चना यांच्या नकळत उघडून आतील 21 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अर्चना पवार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
परंडा  : खंडाळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील चित्राराव बाळु मुळे, वय 19 वर्षे हे दि. 20 मे रोजी 13.00 वा. सु. परंडा येथील कुर्डूवाडी रस्त्यालगतच्या कॅनलजवळ वाहन थांबवून लघूशंका करत होते. दरम्यान दोन मोटारसायकलवर आलेल्या चार अनोळखी पुरुषांनी चित्राराव मुळे यांच्या वाहनातील 99,500 ₹ रक्कम व एक स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या चित्राराव मुळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
शेकापूर येथे हाणामारी 

उस्मानाबाद  : शेकापुर, ता. उस्मानाबाद येथील विठ्ठल पिसे यांसह त्यांची मुले- आकाश व कैलास यांनी दि. 19 मे रोजी 20.30 वा. सु. अमरपॅलेस हॉटेल समोरील रस्त्याने कार चालवत जात असलेले गावकरी- सुरज कुबेर लगदिवे यांची कार आडवली. नमूद तीघा पिसे पिता- पुत्रांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लगदिवे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, चाकूने मारहान करुन जखमी केले. तसेच लगदिवे यांच्या घरच्यांना मारहान करुन ठार मारण्याची धमकी सुरज लगदिवे यांना दिली. अशा मजकुराच्या सुरज लगदिवे यांनी दि. 20 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web