उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली ग्रामस्थ- दिलीप भानुदास चव्हाण यांच्या गट क्र. 196 मधील शेतातील शेडचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 15 जून रोजी रात्री 01.00 ते 02.00 वा. दरम्यान तोडून आतील 55 पोती सोयाबीन चोरुन नेले. अशा मजकुराच्या दिलीप चव्हाण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अंबी : अनाळा, ता. परंडा येथील कानिफनाथ किसन मोटे यांच्या अनाळा येथील शेतातील टाटा कंपनीच्या सौर ऊर्जाच्या 4 सोलार पाट्या दि. 10 जून रोजी 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या कानिफनाथ मोटे यांनी दि. 15 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : शास्त्रीनगर तांडा, दाळींब, ता. उमरगा येथील प्रसाद धनराज पवार यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएच 2337 ही दि. 12- 13 जून रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रसाद पवार यांनी दि. 15 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.