उमरग्यात दोन ठिकाणी चोरी 

 
crime

उमरगा  : हुमनाबाद, जि. बिदर येथील नजीरा शाहमोहम्मद कादरी या कुटूंबीयांसह दि. 09 मे रोजी 11.00 वा. सु. उमरगा बस स्थानकातील उमरगा- लातुर या बस मध्ये बसल्या असता गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने नजीरा यांच्या पिशवीतील 70 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने त्यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या नजीरा कादरी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा  : जकेकुर, ता. उमरगा येथील किरण ईश्वर वागले यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 0293 ही दि. 24.04.2022 रोजी 14.30 ते 18.00 वा. दरम्यान वागले यांच्या शेतातील गोठ्यासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या किरण वागले यांनी दि. 9 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 रस्ता अपघात 

नळदुर्ग  : चालक- नितीन अंकुश जाधव, रा. एकंबा, ता. कोरेगांव, जि. सातारा यांनी दि. 08 मे रोजी 15.45 वा. सु. नळदुर्ग घाटातील महामार्ग क्र. 65 वर विनानोंदणी क्रमांकाचे टाटा कॅश वाहन हे निष्काळजीपने चालवून समोरील वाहणास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्विफ्ट कार क्र. एम.एच. 25 आर 7865 ला समोरुन धडकले. या अपघातात स्विफ्टचे चालक- सत्तार जब्बार बासले, रा. उमरगा यांसह गफार बासले व पुतणी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सत्तार बासले यांनी दि. 9 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web