जळकोटमध्ये खाऊचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीचे अपहरण 

 
crime

नळदुर्ग  :  जळकोट ग्रामस्थ दादाराव शेगर यांची  7 वर्षीय मुलगी वैशाली हिचे येडोळा ग्रामस्थ –रेश्मा सावंत यांनी दिनांक 11 एप्रील रोजी 16.15 वा खाउचे आमीष दाखवुन अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या दादाराव  यांनी दिनांक 13 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 363 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उमरगा  : उमरगा ग्रामस्थ अमोल कुलकर्णी हे दिनांक 13 एप्रील रोजी 15.00 वा उमरगा येथील इंदीरा चौकातील आपल्या इलेक्ट्रॉनीक्स दुकाना समोर उभे होते. यावेळी गावकरी –आकाश जगताप उर्फ  अवकाळया याने त्यांच्या दुकाना समोर उभे राहुन विनाकारण आरडा ओरड सुरु केल्याने अमोल यांनी त्यास हटकले. यावर आकाश याने चिडुन जाउन  अमोल यांना शिवीगाळ करुन व ठार मारण्याची धमकी देउन आपल्या जवळील बिअरच्या काचेच्या बाटलीने अमोल यांच्या डोक्यात, चेह-यावर प्रहार केल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या अमोल कुलकर्णी यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उस्मानाबादेत मोटारसायकल चोरी 

उस्मानाबाद :  रामनगर, सांजा रस्ता येथील समद सययद यांची घराबाहेर असलेली स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एम एच 25 ए ए 3672  ही दिनांक 08 एप्रील रोजी पहाटे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या समद यांनी दिनांक 13 एप्रील रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन  भा.द.स कलम 379 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web