बेंबळी : दोन हजार लाच घेताना महिला कृषी पर्यवेक्षकास रंगेहात पकडले
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक अलका लिंबाजी सांगळे यांना दोन हजार रुपये लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने रंगेहात पकडून बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
बेंबळी येथील ४६ वर्षीय तक्रारदार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून ठिबक आणि तुषार सिंचन सठ मागील काही महिन्यापूर्वी घेतले होते त्याचे अनुदान तक्रारदार यांना प्राप्त होते तसेच तक्रारदार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत तक्रारदार यांच्या भावाच्या नावाने तुषार सिंचन सठ घेतला असून सदर कामाचे अनुदान मिळणेसाठी शासनास ऑनलाईन अहवाल पाठवण्यासाठी आणि तक्रारदार यांचे यापूर्वी केलेल्या कामाचे अहवाल सादर केले म्हणून आलोसे अलका लिंबाजी सांगळे वय 42 वर्षे, कृषी पर्यवेक्षक ( वर्ग -3), तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांनी तक्रारदार यांचेकडे 4000 रु. लाचेची मागणी करून तडजोडी अँटी 2000 रु. लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली .
हा सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलिस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे यांनी रचला होता. नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, उस्मानाबाद *02472222879 @ टोल फ्रि क्रं. 1064