लोहारा : खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींस कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा

 
crime

लोहारा  : सिंदगाव, ता. तुळजापूर येथील- 1)विलास लक्ष्मण भोसले, वय 53 वर्षे 2)किरण विलास भोसले, वय 22 वर्षे 3)विशाल परमेश्वर शिंदे, वय 22 वर्षे या तीघांनी खून केल्या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 302, 307, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 53/2020 नोंदवण्यात येउन या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक- डी.जे. चव्हाण यांनी करुन तपासाअंती गुन्ह्याचे दोषारोपपत्र उमरगा सत्र न्यायालयात दाखल केले होते.

यात साक्षीदारांच्या साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे तसेच शासकीय अभियोक्ते श्रीमती- एस.एम. देशपांडे यांच्या युक्तीवादातून या सत्र खटला क्र. 22/2021 ची सत्र न्यायालय, उमरगा येथे सुनावणी होउन आज दि. 24.11.2022 रोजी सत्र न्यायाधीश अनभुले यांनी उपरोक्त नमूद तीन्ही आरोपींना भा.दं.सं. कलम- 302, 307, 34 च्या उल्लंघनाबद्दल जन्मठेप व प्रत्येकी 1,000 ₹ दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 परंडा : प्राथमिक आरोग्य केंद्र, माणकेश्वर येथील कर्मचारी- कांता धोंडीराम शिंदे, वय 53 वर्षे हे दि. 22.11.2022 रोजी 16.30 वा. सु. आरोग्य केंद्रावर औषधी वाटपाचे काम करत असताना माणकेश्वर ग्रामस्थ- दत्ता मारकड यांनी तेथे जाउन कांता शिंदे यांना विनाकारण शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे मारकड यांनी शिंदे यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या कांता शिंदे यांनी दि. 23.11.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web