नितळी आणि तुळजापूर येथे चोरीची घटना 

 
crime

बेंबळी  : नितळी, ता. उस्मानाबाद येथील- नारायण हरी माने हे मेंढा फाटा येथील कन्हैया पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राव कामास असून त्यांनी दि. 18.09.2022 रोजी 03.00 वा. सु. पेट्रोलियम केंद्रावरील पेट्रोल- डिझेल विक्रीचे 5,000 ₹ रक्कम विजारीच्या खिशात ठेउन ती विजार शेडमध्ये अडकावून झोपले होते. सकाळी 07.00 वा. सु. त्यांनी विजार पाहिली असता त्यातील रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या नारायण माने यांनी दि. 20.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : मार्केट यार्ड, तुळजापूर येथील- वेनाराम सखाराम परमार हे दि. 19.09.2022 रोजी 19.30 वा. सु. तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकासमोरील आपल्या पावभाजी सेंटरवर असताना तुळजापूर ग्रामस्थ- अजय क्षिरसागर यांनी तेथे जाउन, “ तुला येथे व्यवसाय करायचा असेल तर मला रोज 500 ₹ द्यावे लागतील.” असे वेनाराम परमार यांना धमकावून त्यांच्याकडून 500 ₹ खंडणी घेतली. तसेच त्यांच्या शेजारील गणेश परमार, भरत भाटी, बद्रीलालजी या सर्वांच्याही दुकानासमोर जाउन, “ तुम्हालाही येथे व्यवसाय करायचा असल्यास मला रोज पैसे द्यावे लागतील पैसे न दिल्यास मी व्यवसाय करु देणार नाही.” असे धमकावून अजय क्षिरसागर हे तेथून निघून गेले. अशा मजकुराच्या वेनाराम परमार यांनी दि. 20.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 384 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 रत्नापूर येथे दोन गटात हाणामारी 

अंबी  : रत्नापुर, ता. परंडा येथील- मोटे कुटूंबातील लहु मोटे, दिलीप मोटे, संगिता मोटे, लक्ष्मी मोटे, किरण मोटे, बाळु मोटे, विनोद मोटे, नवनाथ मोटे, बंटी मोटे या 9 व्यक्तींनी रत्नापुर गट क्र. 11 मधील सामाईक रस्त्याच्या कारणावरुन दि. 20.09.2022 रोजी 07.00 ते 07.30 वा. दरम्यान गावकरी- बबन व वैजनाथ बाबा मोटे या दोघा भावांना त्यांच्या घरात व घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच नमूद लोकांनी श्रीराम मोटे यांचा मोबाईल फोन फोनडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या वैजनाथ मोटे यांनी दि. 20.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 143, 147, 148, 149, 452, 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web