उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे 

 
crime

भूम  : हाडोंग्री शिवारातील ‘शंकर स्टोन क्रशर’ व ‘शिवखडा स्टोन क्रशर’ येथे महसुल विभागाच्या पथकाने कारवाई करुन दोन्ही क्रशर केंद्रातील एकुण 218 ब्रास मोठी खडी व 240 ब्रास कचखडी ही जप्त करुन स्टोन क्रशर मालक व व्यवस्थापक यांच्या ताब्यात दिली होती. भुम ग्रामस्थ- शिवशंकर पांडुरंग पौळ व अशोक हरिश्चंद्र नरके या दोघांनी दि. 27.08.2021 ते 04.02.2022 रोजी दरम्यान नमूद खडी चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या तहसिल कार्यालय, भुम येथील मंडळ अधिकारी- शिवराज पाटील यांनी दि. 22.02.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : कालीदास नागुराव चौरे, रा. तुळजापूर यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर येथील आडत दुकानाचा पाठीमागील बाजूचा पत्रा दि. 20- 21.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने उचकटून आतील 17 पोती सोयादाने चोरुन नेले. अशा मजकुराच्या कालीदास चौरे यांनी दि. 22.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 641, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : माकणी, ता. लोहारा येथील सरस्वती दिलीप ओवांडकर यांच्या घरात दि. 21.02.2022 रोजी  11.30 वा. सु. करजगाव येथील दोन ओळखीच्या व्यक्तींनी चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या सरस्वती ओवांडकर यांनी दि. 22.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 511, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : कळंब येथील बँक ऑफ इंडीया च्या एटीएम केंद्रातील व योगेश सुभाष इनामदार यांच्या खाजगी मालकीच्या भवानी शंकर एटीएम केंद्रातील एटीएम यंत्र दि. 22.02.2022 रोजी 02.00 ते 04.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने गॅस कटरच्या सहायाने कापून दोन्ही एटीएम यंत्रातील एकुण 20,36,800 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस या कंपनीचे चॅनल व्यवस्थापक- प्रशांत दत्तात्रय मेंढापुरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web