उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
crime

उस्मानाबाद : आनंदनगर, उस्मानाबाद येथील रजनीश धनंजय क्षिरसागर, वय 22 वर्षे हे दि. 24.02.2022 रोजी 07.30 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्याने स्कुटर क्र. एम.एच. 25 एआर 8754 ही चालवत जात होते. यावेळी तीन अनोळखी पुरुषांनी त्यांना अडवून पैशाची मागणी करुन शिवीगाळ केली. क्षिरसागर यांनी पैशे न दिल्याने त्याची नमूद स्कुटर जबरीने घेउन गेले. अशा मजकुराच्या रजनीश क्षिरसागर यांनी दि. 27.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत उस्मानाबाद येथील शफी मोहम्मद हुसेन शेख हे दि. 27.02.2022 रोजी 09.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील साप्ताहीक बाजारात असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या विजारीच्या खिशातील सॅमसंग स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या शफी शेख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : तेरखेडा, ता. वाशी येथील केदार नागनाथ वाळके याच्या साई बासुंदी हॉटेलच्या बाजूस असलेल्या शेडमधील 35 पोती सोयादाणे दि. 27.02.2022 रोजी 01.00 ते 06.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या केदार वाळके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तावरजखेडा, ता. उस्मानाबाद येथील मीराबाई विलास फेरे, वय 49 वर्षे यांच्या घराच्या चॅनल गेटचे व घराचे कुलूप दि. 26- 27.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 38 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 2,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या मीराबाई फेरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web