उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद  : महात्मा गांधीनगर,उस्मानाबाद येथील- नितीन उत्तमचंद मुथा यांचे शेकापुर  शिवारातील शेता मध्ये पिकास पाणी देण्यास ठेवलेले जैन कंपणीचे तुषार सिंचनचे 30 पाईप अंदाजे 20,000 ₹ किंमतीचे हे दि.02.12.2022 रोजी सायंकाळी 06.00 वा ते दि. 03.12.2022 सकाळी 09.00 वा दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या नितीन मुथा यांनी दि.28.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : खानापुर,ता.उस्मानाबाद येथील- दिनकर मधुकर निकम वय 53 वर्ष यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची होडां ॲक्टीवा स्कुटर मोटारसायकल क्र.एम.एच.25 एयु  7514 ही दि.08.12.2022 रोजी 20.00 ते 20.30 वा. दरम्यान गवळीवाडा येथील आचल अर्पाटमेंन्ट पार्कींग मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिनकर निकम यांनी दि.28.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : जिजाउनगर, उस्मानाबाद येथील- नितीन दिनकर जाधवर वय 40 वर्ष यांचे दि.22.12.2022 रोजी 20.00 ते दि.25.12.2022 रोजी 13.00 वा. दरम्यान उस्मानाबाद  येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाचे मागील मोकळ्या जागेतुन अंदाजे 27,700 ₹ किंमतीचे साहित्य जुने  टायर्स 20,लोखंडी खुर्च्या 8, लोखंडी  रॅक 1, लोखंडी जाळ्या 7, लोखंडी गजाचे 2245 किलो वजनाचे तुकडे असे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या नितीन जाधवर यांनी दि.28.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  :दाउतपुर, ता. उस्मानाबाद येथील- दिपक जरिचंद्र गिरी  यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि.27.12.2022 रोजी रात्री 08.00 ते दि.28.12.2022 रोजी 05.00 वा.चे सुमारास तोडुन घरातील अंदाजे 58,000 ₹ किंमतीचे झुबेफुले,मण्याचे गंठण,एक अंगठी व कानातील रिंगा असे सुवर्ण दागिने  असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दिपक गिरी  यांनी दि. 28.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : समर्थ नगर, परंडा येथील- सुबराव सदाशिव सांगळे वय 79 वर्ष यांच्या बंद घराचा कुलूप  अज्ञात व्यक्तीने दि.28.12.2022 रोजी 16.15 वा.चे सुमारास तोडुन घरातील कपाटा मध्ये ठेवलेले एकुण 25,805 ₹ रोख रक्कम व पितळी नाणी असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुबराव सांगळे यांनी दि.28.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web