उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी हाणामारी 

 
crime

ढोकी  : येवती, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- नानासाहेब महादेव मुंठे, वय 50 वर्षे हे दि. 16 मे रोजी 12.00 वा. सु. शेतातील घरासमोर असतांना एका मोटारसायकलवर आलेल्या तेर येथील केशव बळवंत पांढरे व नानासाहेब यांच्या भावाचा ईवाई यांनी जुन्या वादावरुन नानासाहेब मुंठे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन दगडावर ढकलून दिले. यात नानासाहेब यांच्या उजव्या मनगटाचे हाड मोडूल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या नानासाहेब यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : अणदुर, ता. तुळजापूर येथील दिपक श्रीकांत घोडके व भैय्या या दोघा पिता- पुत्रांनी दि. 14 मे रोजी सकाळी 08.00 वा. सु. गावकरी- सुरेश अंबादास चौघुले यांना त्यांच्या घरासमोर जाउन शेतात कामास न आल्याच्या कारणावरुन सुरेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, प्लास्टीक नळी, काठीने मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत  सुरेश यांच्या डाव्या हाताचे हाड मोडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या सुरेश चौघुले यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : बाबळसुर, ता. उमरगा येथील जिवन रंगराव सुर्यवंशी हे दि. 15 मे रोजी 10.30 वा. सु. गट क्र. 40 मधील आपले शेत नांगरत होते. यावेळी भाऊबंद- शेषेराव अर्जुन सुर्यवंशी, बालाजी सुर्यवंशी, मिराबाई सुर्यवंशी, महादेवी सुर्यवंशी यांनी शेत नांगरणीच्या कारणावरुन जिवन सुर्यवंशी यांसह पत्नी- संगिता यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली व शेतातील पाईप फोडून आर्थिक नुकसान केले. तसेच मिराबाई यांनी संगिता यांच्या डाव्या हातास चावा घेउन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या जिवन सुर्यवंशी यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 427, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : करवंजी, ता. लोहारा येथील काशीनाथ दिगंबर देवकर यांनी दि. 16 मे रोजी दुपारी 03.00 वा. सु. गावकरी- कोंडीबा सोपान हाके हे कुपनलीकेत विद्युत पंप सोडण्यास येत नसल्याच्या कारणावरुन कोंडीबा यांना त्यांच्या घरा समोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व बियरची बाटली फेकून मारल्याने कोंडीबा यांच्या उजव्या हातास जख झाली. अशा मजकुराच्या कोंडीबा यांची आई- संतबाई हाके यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 336, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : पारगाव, ता. वाशी येथील श्रीपती उत्तमराव घुले हे दि. 14 मे रोजी 02.00 वा. पारगाव येथील हॉटेल गंगासागर येथे होते. यावेळी रुई ग्रामस्थ- सचिन मच्छिंद्र इंगोले यांनी जुन्या वादावरुन श्रीपती घुले यांना शिवीगाळ करुन हातोडी सारख्या अवजड वस्तून श्रीपती यांच्या डोकीत मारण्याचा प्रयत्न केला असता श्रीपती यांनी तो वार चुकवल्याने त्यांच्या डाव्या डोळ्यास लागून, गालावर ठोसा मारल्याने श्रीपती यांच्या एक दात पडून व उजव्या हाताच्या बोटास चावा घेतल्याने श्रीपती हे गंभीर जखमी झाले.

            तर सचिन मच्छिंद्र इंगले, रा. रुई यांनी दि. 14 मे रोजी 12.00 वा. सु. पारगाव येथील आपल्या हॉटेल गंगासागर येथे श्रीपती उत्तमराव घुले, रा. पारगाव यांना जेवनाचे बिल मागीतले. यावर श्रीपती यांनी सचिन यांना बिल न देता शिवीगाळ करुन निघुन गेले. थोड्यावेळाने श्रीपती यांसह वैभव घुले, पृथ्वीराज घुले, सतीष कोठोवळे यांनी सचिन यांच्या हॉटेलात येउन त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कोयता, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी देउन गल्ल्यातील 7,000 ₹ जबरीने घेउन गेले.

            अशा मजकुराच्या श्रीपती घुले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506 तर सचिन इंगले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 326, 324, 323, 504, 506, 452 अंतर्गत असे स्वतंत्र दोन गुन्हे दि. 17 मे रोजी नोंदवले आहेत.

From around the web