मुरूम मध्ये दोन गटात हाणामारी
मुरूम : जुन्या भांडणाच्या कारणावरुन साठेनगर, मुरूम येथील- किशोर देडे,जया देडे,तुळशीराम देडे,करिश्मा देडे यांनी दि.24.12.2022 रोजी 21.30 वा. सु. पाटीमागील भांडणाचा राग मनात धरून लक्ष्मी देडे यानां शिवीगाळ करत असताना लक्ष्मी यांची सासु मिराबाई व नवरा शाम देडे भाडंण सोडवण्यास आले त्यानां ही शिवीगाळ करून मारहान केली.तसेच लक्ष्मी मोठा मुलगा प्रेम देडे हा मध्ये आल्याने जया देडे यांनी त्याला ढकलून दिल्याने प्रेमच्या डाव्या पायाचे नडगीचे हाड फॅक्चर झाले. अशा मजकुराच्या लक्ष्मी देडे यांनी दि. 28.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-325 323,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
उमारगा : चिंचोली (ज), ता.उमारगा येथील-शिवाजी मंमाळे यांनी दि. 28.12.2022 रोजी 19.10 वा.सु. उमारगा येथील एन.एच.65 आरोग्य कॉर्नर समोरील रस्त्यावर आपल्या ताब्यातील ॲपे रीक्षा क्र.एम.एच. 22 एच 1219 हा रहदारीस धोकादायकरीत्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमारगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.