भूम : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 
crime

भूम : माळी गल्ली, भुम येथील प्रवीण अशोक माळी, वय 45 वर्षे यांनी गावकरी- अक्षय चौधरी यांसह इतरांकडून 60 हजार रुपये उधार घेतले होते. नमूद लोकांनी ते पैसे अथवा त्या मोबदल्यात शेत नावे करुन देण्याकरीता वेळोवेळी प्रवीण माळी यांच्याकडे तगादा लावल्याने त्यांनी शेतातील झाडास गळफास घेउन दि. 01-02 मे दरम्यानच्या रात्री आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- वंदना यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी मारहाण 

उस्मानाबाद : खानापूर येथील सारीका कांबळे  व शेजारी राहणाऱ्या शोभा झेंडे या दोन्ही कुटूंबीयांचा दि. 01 मे रोजी 20.30 वा. सु. किरकोळ कारणावरुन वाद झाला. यावेळी शोभा यांसह पती- चंद्रकांत, मुलगा- समाधान यांसह अन्य 3 व्यक्तींनी सारीका व त्यांची मुलगी- संध्या, पती- हनुमंत यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विटेने मारहान केली. तसेच दारातील शेळीच्या पिलाला काठीने मारहान करुन ठार मारले. अशा मजकुराच्या सारिका यांनी दि. 02 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149,327, 324, 323, 504, 506, 428 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : देवळाली येथील सुधाकर रामभाउ जाधव यांच्या शेतातील विहीरीचे बांधकाम भाऊ- महादेव यांनी आक्षेप घेउन थांबवले होते. याच वादातून सुधाकर यांसह त्यांचा मुलगा- मुकेश यांनी दि. 01 मे रोजी महादेव यांना त्यांच्या घरासमोर जाउन शिवीगाळ करुन फरशीचा तुकडा महादेव यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. यावेळी महादेव यांच्या बचावास त्यांची पत्नी- सविता आल्या असता त्यांनाही ढकलून जमीनीवर पाडले. अशा मजकुराच्या महादेव यांनी दि. 02 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web