उस्मानाबाद शहरात जुगार विरोधी कारवाई

 
crime

उस्मानाबाद  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 20.09.2022 रोजी उस्मानाबाद शहरात तीन ठिकाणी छापे टाकले. यात बौध्दनगर येथील- सागर उत्तम गायकवाड हे 15.30 वा. सु. शहरातील एल.आय.सी. कार्यालयाच्या कुंपनालगत कल्याण मटका व मिलन मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,080 ₹ रोख रक्कम बाळगलेले, तर सांजावेस गल्ली येथील- सरफराज अलमोद्दीन शेख हे 16.25 वा. सु. खडकपुरा येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,870 ₹ रोख रक्कम बाळगलेले, तसेच धारासुर मर्दीनी कमानीजवळील- राहुल जालींदर जाधव हे 18.30 वा. सु. राहत्या परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एक मोबाईल फोन व 1,280 ₹ रोख रक्कम असा एकुण 19,280 ₹ चा मला बाळगलेले असताना पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह मोबाईल फोन, रोख रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.  

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

 लोहारा  : तावशिगड, ता. लोहारा येथील- भैरव गोपाळसिंग राजपुत हे दि. 20.09.2022 रोजी 12.30 वा. सु. गावातील आपल्या चहा हॉटेलच्या पाठीमागे अंदाजे 600 ₹ किंमतीच्या 10 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

वाशी  : ईट, ता. भुम येथील- धनंजय सुरेश भोसले हे दि. 20.09.2022 रोजी 16.30 वा. सु. ईट येथील पखरुड रस्त्यालगतच्या हॉटेल गारवाच्या बाजूस अंदाजे 840 ₹ किंमतीच्या 12 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web