उस्मानाबादेत अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

उस्मानाबाद  : अमृतनगर, उस्मानाबाद येथील- दिलदार अबरार पठाण, वय 38 वर्षे यांनी दि.  02.11.2022 रोजी 11.30 वा. सु. आपल्या राहत्या घरात गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण 84,605 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करण्यासाठी बाळगलेले असताना अन्न व औषध प्रशासन विभाग, उस्मानाबाद यांच्या पथकास आढळले. यावरून पथकाने तो माल जप्त करुन अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती- नसरीन तनवीर मुजावर यांनी दि. 02.11.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26 (2) (iv), 27 (3) (c) सह वाचन अधिनियमांतर्गत 316/2022 हा गुन्हा आनंदनगर पो.ठा. येथे काल दि. 02.11.2022 रोजी नोंदवला आहे.

दोन ठिकाणी चोरी 

भूम  : पाथरुड, ता. भुम येथील- तुषार बाबुराव गव्हाणे यांच्या दुधोडी गट क्र. 305, 307, 314 मधील शेतातील अंदाजे 50,000 ₹ किंमतीचे उभे सोयाबीनचे पीक जोतीबाचीवाडी, ता. भुम येथील- महोदव सर्जेराव यादव यांसह त्यांची पत्नी व त्यांची दोन मुले या सर्वांनी दि. 26.10.2022 रोजी 17.00 वा. सु. कापून चोरुन नेले. अशा मजकुराच्या तुषार गव्हाणे यांनी दि. 02.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : हावरगाव येथील संत ज्ञानेश्वर माउली माध्यमिक विद्यालयाच्या कार्यालयाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 31.10.2022 रोजी 16.00 वा. ते दि. 01.11.2022 रोजी 09.00 वा. दरम्यान तोडून कार्यालयातील गॅस सिलेंडर, मुगदाळ- 5 कि.ग्रॅ., हरभरा- 10 कि.ग्रॅ., चटई- 2 नग, रजिस्टर- 12 नग, शिक्के, पोषन आहार नोंदवही व झेरॉक्स पेपर असे एकुण 2,570 ₹ किंमतीचे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या मुख्याध्यापक- दिपक बंकटराव शेळके यांनी दि. 02.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web