उस्मानाबादेत १७ वर्षाची मुलगी बेपत्ता
उस्मानाबाद : एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 09.02.2022 रोजी 11.00 वा. सु. आपल्या घरासमोर असतांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाणीच्या दोन घटना
येरमाळा : भोसा, ता. कळंब येथील जमीर शेख, तय्यब शेख, आयुब शेख, समीर शेख, वाहेद पटेल, आबरार शेख, अयाज शेख या सर्वांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 09.02.2022 रोजी 19.00 वा. सु. गावातील हनुमान मंदीर चौकात गावकरी- माजीद लाला शेख यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या माजीद शेख यांनी दि. 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : कुन्हाळी, ता. उमरगा येथील बोळेगावे कुटूंबातील सिध्देश्वर, शुभम, संगिता यांनी शेतातील कुपनलीकेत विद्युत पंप सोडणीच्या वादावरुन दि. 09.02.2022 रोजी 18.00 वा. सु. भाऊबंद- प्रदिप बोळेगावे यांसह त्यांचा मुलगा- मुकेश यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, काठीने मारहान करुन त्या दोघांना जखमी केले. अशा मजकुराच्या मुकेश बोळेगावे यांनी दि. 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.