सांजा रोडवर क्रिकेट खेळताना बारा वर्षाच्या मुलाचा दुर्देवी अंत 

 
crime

धाराशिव  : मयत नामे- सोहम संतोष कांबळे, वय 12 वर्षे, रा.  रामनगर,सांजा रोड बायपास उस्मानाबाद हे दि.13.07.2023 रोजी 17.30  वा. सु विठ्ठल रुक्मिणी मंदीरासमोर मैदानात क्रिकेट खेळत असताना बॉल तुळजापूर ते औरंगाबाद जाणाऱ्या रोडवर गेल्याने तेा आणण्यासाठी गेला असता अज्ञात स्विप्ट डिजायर कार चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवून  सोहम कांबळे यांना धडक दिली.

 या आपघातात मयत नामे सोहम कांबळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद वाहनाचा अज्ञात चालक आपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा वडील- संतोष भागवत कांबळे यांनी दि.18.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.      


वाशी  : मयत नामे- लक्ष्मण गंगाधर बहिर, रा. शिरापूर धुमाळ, ता. शिरुर जि. बीड हे दि.17.07.2023 रोजी 10.00  वा. सु पारगाव बायपासचे पुढे संभाजीनगर ते सोलापूर जाणारे एनएच रोडवरुन इनोव्हा  क्र एमएच 12 सी वाय 6438 मधून जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवून  इनोव्हाला धडक दिली. या आपघातात मयत नामे लक्ष्मण बहिर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालक आपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाउ नामे- गणेश गंगाधर बहिर यांनी दि.18.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.                                                                               


निष्काळजीपने वाहने चालवणाऱ्यावर गुन्हा नोंद

उस्मानाबाद  : अरोपी नामे- दुर्गाप्पा शिवराम पवार, वय 25 रा. वाघेश्वर मंदीर बाघाली, ता. हवेली जि. पुणे ह.मु. शिंदेवाडी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.17.07/2023 रोजी  23.50 वा. सु. वाघोली पाटीजवळ रोडवर आपल्या ताब्यातील टिप्पर क्र. एम.एच. 24 एच 8787 हे वाघोली पाटीजवळ रस्त्यावर भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 सह मो.वा.का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web