आठ डिसेंबरला 'भारत बंद' चा इशारा 

 
आठ डिसेंबरला 'भारत बंद' चा इशारा

नवी दिल्ली - केंद्र सरकारसोबत शेतकरी संघटनेच्या नव्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या चर्चेमधून कोणताही निष्कर्ष निघत नसल्यामुळे शेतकरी संघटनेचे  नेते हरविंदरसिंग लखोवाल यांनी आठ डिसेंबर रोजी भारत बंद चे आवाहन केले आहे. 

शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे ५ डिसेंबर पूर्वी रद्द करा नाही तर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळे जाळले जातील, असा इशारा आम्ही सरकारला दिला होता परंतु त्यांनी अजूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही आहे. त्यामुळे आम्ही ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा करत आहोत, असे हरविंदरसिंग लाखोवाल यांनी सांगितले.  

करोना विषाणूचा धोका लक्षात घेता आणि दिल्लीच्या सीमेवर होणारी  गर्दी हटवण्याकरिता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या दोन दिवसात सुनावणी करण्यात  येण्याची शक्यता आहे. 

दिल्लीच्या सिमेवर गेले नऊ दिवस शेतकऱ्याचे आंदोलन सुरु आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभर पसरत आहे. शेतकऱ्यांच्या संशोधन नको असून कायदा मागे घ्या अशी त्यांची मागणी आहे नाही तर प्रत्येक राज्यात शेतकरी आंदोलन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी काल झालेल्या बैठकी मध्ये सरकारनी दिलेले जेवण नाकारून लंगरमधील जेवणाला प्राधान्य दिला . त्यामुळे केंद्र सरकार आता नव्या कृषी कायद्यामुळे दुखावलेल्या शेतकरी संघटनेच्या मागण्या कशा पूर्ण करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
 

From around the web