मोदी यांनी भूमिपूजन केलेली अशी असेल संसदेची नवी इमारत.... 

 
मोदी यांनी भूमिपूजन केलेली अशी असेल संसदेची नवी इमारत....

 नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद इमारतीचं भूमीपूजन केलं.  त्यानंतर सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली. या समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्यमंत्र प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री हरदीप सिंह पूरी आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह सहभागी झाले होते. 

 यानंतर  मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, जर जुन्या संसद भवनने स्वातंत्र्योत्तर भारताला दिशा दिली तर नवीन इमारत स्वावलंबी भारत निर्मितीची साक्ष होईल. जुन्या संसद भवनात देशाच्या गरजा भागवण्यासाठी काम केले गेले तर 21 व्या शतकाच्या भारताच्या आकांक्षा नव्या इमारतीत पूर्ण होतील.

पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात असेही सांगितले की, आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. नवीन संसद भवनाचा पाया घातला गेला आहे. आम्ही, भारतीय जनता संसदेची ही नवीन इमारत संयुक्तपणे बनवू. जेव्हा आम्ही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत तेव्हा १३०  कोटी भारतीयांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. नवीन संसदेची इमारत म्हणजे वेळ आणि गरजांनुसार स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न.

असे असेल संसदेची नवी इमारत.. 

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था असणार आहे. सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत. नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहे. या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल. याशिवाय 120 कार्यालये, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.


केवळ संसदेची नवी इमारतच नव्हे तर सर्व मंत्रालयं एकत्रित आणण्यासाठी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टही मोदी सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे राजधानीचं सगळं रंगरुपच बदलून जाणार आहे. त्या बदलाची ही सुरुवात आता संसदेच्या कामामुळे दिसायला सुरुवात झाली आहे.

From around the web