राज्यात मातंग व बौद्धांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

 
s

धाराशिव - नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील बौद्ध युवक अक्षय भालेराव याची जातीय वादातून निर्घृण हत्या करण्यात आली. तर वाळकी (बु) व रेणापूर तालुक्यातील एका मातंग समाजातील तरुणाचा सावकाराने काठीने मारुन खुन केला. तर राज्यात विविध ठिकाणी मातंग व बौद्ध समाजावर जातीय द्वेशाने हल्ले होत आहेत. हल्ले करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१२ जून रोजी आंदोलन केले.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावातील जातीय तणाव दूर व्हावा व सामाजिक सलोखा राखून संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सर्व प्रयत्न केले. गावात डॉ आंबेडकर जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून त्याचा निर्घृणपणे खून केला. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून हे प्रकरणाचा जलदगतीने तपास पूर्ण करून त्याचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाळकी येथील मातंग समाजातील लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात. याचा राग मनात धरून मातंग वस्तीवर रात्रीच्या वेळी लाईट बंद करून जमावाने सामूहिक हल्ला केला या हल्ल्यात गायकवाड हा तरुण जखमी झाला. संबंधित गुंडावर गुन्हा दाखल न करता उलट मातंग समाजातील पंधरा-सोळा तरुणावर दरोड्याचा खोटा गुन्हा नोंदवून त्यांना जेलमध्ये टाकले आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील अत्यंत क्रूर व मानवतेला काळीमा फाटणारी घटना घडली असून गिरधारी तबघाली या मातंग समाजातील व्यक्तीने त्याच गावातील सावकाराकडून १० टक्क्याने व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे २० हजार रुपये वसूल करून देखील आणखी पैसे द्यावेत, अशी मागणी करीत भर बाजारात त्यांना काठीने मारहाण केली तबकाले यांनी रेनापुर पोलीस स्टेशनला गेले असतात त्यांची तक्रार नोंदवून घेतली नसल्यामुळे आरोपींचे बळ वाढले व त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तबघाले यांच्या घरी हल्ला चढवून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून रॉडने हल्ला केला व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 

तसेच मुंबई चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका १९ वर्षीय बौद्ध युतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या सर्व घटनेमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला असून राज्यात मातंग बौद्ध समाज हा जातीवादी मंडळीच्या हल्ल्याचा अत्याचाराचा शिकार होत आहे हे स्पष्ट होत आहे. नांदेड जिल्ह्यात अनु जाती. व अनु. जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार झाल्यामुळे  जिथे-जिथे ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तिथे-तिथे या घटकांतील व्यक्तीविरुद्ध जाणून बुजून कलम ३९५ सारखे दरोड्याचे खोटे गुन्हे नोंदविलेले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, युवक जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, सुजाता बनसोडे, विकास बनसोडे, ऍड. के.टी. गायकवाड, कुंदन वाघमारे, गोविंद भंडारे, अशोक कांबळे, सविता कांबळे, सुनील वाघमारे, सुरेखा गंगावणे, सुमन वाघमारे, बालाजी राऊत, सिध्दार्थ कांबळे, प्रशांत शिंदे, रघुनाथ गायकवाड, सोमनाथ नागटिळक, समीर काझी, भाऊसाहेब अणदूरकर, नागनाथ शिंदे, महादेव कांबळे, सुधाकर शिंदे, आनंद गाडे, नंदकुमार हावळे, बाबा वाघमारे,  आदी उपस्थित होते.

From around the web