शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा तुळजापूर तालुक्यात पूर्ण 

 
s

तुळजापूर - शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेयांच्या आदेशाने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियान या उपक्रमा अंतर्गत उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणातील शिवसैनिक, युवासैनिक यांच्याशी जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

ds

यावेळी युवासेनेचे राज्यविस्तारक अविनाशजी खापे-पाटील, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल ताई वडणे,तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,शाम मामा पवार, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी,माजी शहरप्रमुख प्रवीण भय्या कोकाटे, जेष्ठ शिवसैनिक भीमा आण्णा जाधव,उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, सुनील जाधव, संजय भोसले, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाप्रमुख अमिरभाई शेख, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण पाटील, राजअहमद पठाण,बापू नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे,युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे, प्रदीप इंगळे विभागप्रमुख अनिल भोपळे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, सो.मी.विभागप्रमुख विकास सुरवसे, युवासेना शाखाप्रमुख सचिन मोरे, युवासेना, विभागप्रमुख संतोष घोडके, सिद्धराम कांबळे ,नवाज शेख, सागर कदम, तोफिक शेख यांच्यासह अनेक स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत दुसरा टप्पा संपन्न झाला. 

s

शाखाप्रमुख, विभागप्रमुख, पदाधिकारी आणि महिला आघाडी यांना आ.कैलास पाटील यांनी संबोधित करताना सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेली आणि होत असलेली विविध विकास कामे समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचे काम संघटित होऊन करण्याचे आवाहन केले तसेच समाजातील विविध घटकांसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी कार्यरत राहण्याचेही आवाहन केले.

प्रत्येक शिवसैनिकांनी गावातील नागरिकांशी संपर्क वाढवत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी तत्पर राहतानाच शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत रुजविण्याचे त्याचबरोबर शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे साहेब आणि युवासेनाप्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांचा महाराष्ट्र राज्याला अग्रेसर बनविण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचा दृष्टिकोन समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवत शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठीचे कार्य जोमाने आणि एकदिलाने करण्याचे आवाहन आ. कैलास पाटील यांनी केले.

From around the web