पंतप्रधान मोदींना प्रतिकात्मक बैलगाडीतून ज्वारी, गहू आणि कापूस पाठवले
पाडोळी -केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनास राष्ट्रवादी युवती काँग्रेसने पाठींबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिकात्मक बैलगाडीतून ज्वारी,गहू आणि कापसाचे पॉकेट स्पीड पोस्टने पाठविले आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची पंतप्रधान मोदींनी दखल घ्यावी या अनुषंगाने हे पार्सल पाठविण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा देवकन्या गाडे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या दिपज्योती आकोसकर,कल्याणी डांगे,शुभांगी डांगे याही उपस्थित होत्या.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधात जे कृषी विधेयक बील पास केले, त्या विरोधात शेतकरी हा आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला संपूर्ण देशातून प्रत्येक संघटनांनी तसेच अनेक शेतकरी बांधवांनी पाठिंबा दिला.आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.त्याच माझ्या कृषिप्रधान देशात आज शेतकरी राजावर अन्याय होत आहे.हे जे विधेयक पास केले गेले ते शेतकऱ्यांना मान्यच नाहीत.तरीही केंद्र सरकार हे बील मागे घेत नाही .
आपण जो कायदा करतो तो जनतेच्या हितासाठी आणि फायद्यासाठी असायला हवा. हे कृषी बिल शेतकऱ्यांच्या फायद्याचं किंवा हिताचं वाटत नसेल तर केंद्र सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा देवकन्या गाडे यांनी केली आहे.