नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षकांची तुळजापूरला भेट

 
s

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव   येत्या 7 ऑक्टोबर पासून सुरु होता आहे. याच वेळी महाराष्ट्र राज्यातील प्रार्थनास्थळे जनतेस खुली होत असून याच दिवशी नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. 

त्यास अनुसरुन श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थान विश्वस्त व्यवस्था अंतर्गत तुळजाभवानी मंदीराशी संबंधीत पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना यांनी आज दि. 29 सप्टेंबर रोजी तुळजापूर मंदीरास भेट दिली. या प्रसंगी मंदीर संस्थानच्या मुख्य प्रशासकीय ईमारतीच्या बैठक कक्षात त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन, अपर पोलीस अधीक्षक  नवनित कॉवत, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अंजुम शेख, मंदीर संस्थानच्या मुख्य व्यवस्थापक तहसीलदार श्रीमती कोल्हे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

            तुळजापूर नवरात्रोत्सवा दरम्यान अवैध व्यवसाय, रस्त्यावरील अतिक्रमने, फेरीवाले यांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे तसेच रुग्णवाहीका, अग्निशमन, आपत्ती निवारण, विद्युत पुरवठा, सार्वजनिक स्वछता, महामार्गावरील वाहतुक वळविणे इत्यांदी संबंधी इतर प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून प्रभावी कार्य करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षकांना दिले. मंदीर संस्थान प्रशासनाने कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे पालन करुन तसेच भाविकांच्या मंदीर प्रवेशा संबंधीचे नियोजन करुन भाविकांना नियंत्रीत संख्येने मंदीर आवारात व मंदीरात प्रवेश द्यावा अशा सुचना त्यांनी मंदीर प्रशासनास केल्या आहेत.

From around the web