ढोकी व चार गाव योजनेचा सौरप्रकल्प व गाव अंतर्गत वितरण प्रणाली नव्याने होणार
धाराशिव - धाराशिव येथे आज आ.कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत राबविण्यात आलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ढोकी, (तेर, क. तडवळा, येडशी) व चार गावे ही योजना दिनांक-२९/०७/२००५ रोजी पुर्ण झालेली असुन सदर योजनेची दैनंदिन देखभाल दुरुस्ती दि.०२/०२/२०२२ पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेमार्फत करण्यत येत होती.
या योजनेचे थकीत विजबिल भरणा न केल्यामुळे दि.१७/०६/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे योजनेव्दारे होणारा पाणी पुरवठा बंद होता. तद्नंतर सदरील योजना जिल्हा परिषद धाराशिव यांचेमार्फत दैनंदिन देखभाल दुरुस्ती व संचालनाकरीता सहमतीने शिखर समिती /सुकानु समितीकडे वर्ग करण्यात आली. परंतु सदर योजना विज बिल थकल्यामुळे त्यांनीही पाणी पुरवठा सुरळीत केली नाही. त्यामुळे सदर योजनेचा आढावा घेण्यासाठी आ. कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सदर योजना चालु करण्यासाठी दि.३०/०६/२०२२ पुर्वीचे थकीत विद्युत देयक महाराष्ट्र उद्योग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णयानुसार एक रक्कमी रक्कम अदा (ओ.टी.एस.) करण्याचे योजनेव्दारे रक्कमेमधील व्याज, विलंब अकार माफ करुन मुद्दलाची रक्कम ग्राम विकास विभागामार्फत महवितरण कंपनीस अदा करण्यात येणार आहे.
तसेच दिनांक-३०/०६/२०२२ नंतरचे योजनेचे उर्वरित १० लक्ष विज देयक हे १५व्या वित्त आयोग ग्रा.प. स्तर / जिप. स्तर अंतर्गत उपलब्ध निधीमधुन महावितरणला अदा करण्यास सदर बैठकीत ठरले.ढोकी व चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्र व उद्वव विहीर येथे सौरउर्जा प्रकल्प उभारुन योजना स्वयंपुर्ण करण्यासाठी २२० किलो वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित आहे. त्यासाठी मेडा लातुर यांचेकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग धाराशिव यांचेकडे निधी वर्ग करण्यात आलेला आहे. तथापी सदर प्रकरणी अदयाप निविदा प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. यावर सविस्तर चर्चा होऊन सदर निविदा प्रक्रिया तात्काळ पुर्ण करुन उपलब्ध निधीच्या मर्यादेत काम पुर्ण करणेबाबत महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा पुणे यांना सुचना देण्यात आल्याचे सांगीतले.
ढोकी व चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना उध्दरन नलिका व गाव अंतर्गत वितरण प्रणाली ही जुनी असल्याने व सदर योजना झाल्यानंतर गावांतर्गत विस्तार वाढ झाली आहे.त्यामुळे सदर योजनेचे उध्दरन नलिका व गाव अंतर्गत वितरण प्रणालीचे भविषयात वाढणारी लोकसंख्या व गावची विस्तार वाढ या गोष्टी विचारात घेऊन या योजनेच्या कामाची नव्याने अंदाजपत्रके महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी १५ दिवसात तयार करण्याचे व सदर योजनेचे काम जलजीवन मिशन योजनेतुन हाती घेण्याच्या सुचना आ. कैलास पाटील यांनी केल्या.
बैठकीस राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव गुजर अधिक्षक अभियंता महावितरण, गांधोले अधिक्षक अभियंता महाऊर्जा बीड, देशपांडे कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु. जि. प. धाराशिव, ढवळे कार्यकारी अभिययंता जीवण प्राधिकरण, . दिपक नाईकनवरे उप अभियंता सिंचन विभाग, व संग्राम देशमुख मा.पंचायत समिती सदस्य, अमर समुद्रे, सौ.स्वाती जमाले, सरपंच क.तडवळा, डॉ.प्रशांत पवार, , विशाल जमाले, श्रीमंत फंड उपसरपंच तेर तुळशिदास जमाले ,अंकुश मोरे इत्यादी बैठकीस उपस्थित होते.