श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत ऑनलाईन पध्दतीने सिंहासन पूजा नोंदणीचे भाविकांना आवाहन

 
tuljabhwani

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात. श्री देवीजींची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर http://shrituljabhavani.org  उपलब्ध करुन देण्यात येत आहे. माहे ऑक्टोबर- 2023 या महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक करण्यात येत आहे.

                  श्री तुळजाभवानी देवीजींचा शारदीय नवरात्र महोत्सव 06 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. श्री देविजींची मंचकी निद्रा 7 ते 14 ऑक्टोबर व 24 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत आहे. त्यामुळे या कालावधीत सिंहासन पूजा बंद राहतील. तसेच माहे ऑक्टोंबर 2023 मधील इतर दिवशी सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील याची सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी, सेवेकरी व नागरिकांनी नोंद घ्यावी.

                  भाविकांनी सिंहासन पूजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ http://shrituljabhavani.org वरुन सिंहासन पूजा पास बुकींग या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर http://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करुन भाविकांनी आपली सिंहासन पूजेची नोंदणी करावी आणि सिंहासन पूजा नोंदणीचा लाभ घ्यावा, असे श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

                     सिंहासन पूजा नोंदणी 26 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10.00 वा.पर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात येईल. 

                     भाविकांना प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने द्वितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविला जाणार आहे. 

                   भाविकांना द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. प्रथम व द्वितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत  पाठविण्यात येणार आहे. 

                   भाविकांना तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. माहे सप्टेंबर 2023 या महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी दि.29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 05.00 वाजता प्रसिध्द करण्यात येईल.

 ६  ते  ३० ऑक्टोबर कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव

प्रतिवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी देविजींचा शारदीय नवरात्र महोत्सव-2023   शके 1945 दिनांक 06/10/2023 ते 30/10/2023 या कालावधीत साजरा होत आहे. सदर महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व इतर राज्यातून मोठया संख्येने भाविक श्री क्षेत्र तुळजापूर शहरात श्री देविजींचे दर्शनासाठी येतात. 

    तुळजापूर शहरात येणाऱ्या प्रत्येक भाविकास आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा मिळाव्यात या करीता करावयाच्या उपाय योजनांबाबत जिल्हयातील विविध शासकीय विभाग प्रमुख यांचे समवेत  जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 25/09/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पंचायत समिती कार्यालय, सभागृह येथे शारदीय नवरात्र महोत्सव-2023 आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीनंतर दुपारी 12.00 वाजता तुळजापूर शहरातील नागरीकांनी नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने आपल्या सुचना मांडणेसाठी याव्दारे अवाहन करण्यात येत आहे. तसेच दुपारी 01.00 वाजता जिल्हाधिकारी महोदय पत्रकार परिषद घेणार असून सर्व पत्रकार बंधुंनी पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात येते.        

From around the web