रब्बीच्या अधिसुचित पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आता माहिती द्या

 - शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्याचे आवाहन
 

उस्मानाबाद -हवामान शास्त्र विभागाने मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 16 ते 19 फेब्रुवारी च्या दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. या कालावधीत रब्बी हंगामातील विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफूटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. तेव्हां विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर निहायइ बाधीत पीक व बाधीत पिकाचे क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक राहील.

पीक नुकसानीची सुचना विमा कंपनी, संबंधित बँक,कृषी विभाग/महसुल विभाग यांचेकडे किंवा 18002095959 या टोल फ्री क्रमांकाद्वारे देण्यात यावी. सर्वप्रथम टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा.

 टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास नुकसानीची माहीती विमा कंपनी प्रतिनिधी, बॅक, कृषि विभाग/महसुल विभाग यांना द्यावी. तसेच केंद्र शासनाद्वारे तयार केलेले पीकविमा (crop insurance) किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे अॅप मध्ये देखिल नुकसानीची पुर्वसूचना देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तेव्हां ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरलेला आहे.त्यांनी अशा अधिसुचित पिकांचे क्षेत्र जलमय होऊन, भूस्खलन, गारपीट, ढगफूटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग इत्यादी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास उपरोक्त पध्दतीचा अवलंब करुन नुकसानीची पुर्वसूचना 72 तासाच्या आत द्यावी असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.  

From around the web