सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनास शेतकऱ्यांनी सहकार्य करावे  -  रावसाहेब पाटील-दानवे

•   शेतकऱ्यांना योग्य  मोबदला नक्कीच दिला जाईल
 
s
•  रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया  लवकर पूर्ण करण्याच्या प्रशासनला सूचना

धाराशिव  :  सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नियोजित रेल्वे मार्गासंबंधी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

  श्री.दानवे पुढे म्हणाले, यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राला रेल्वेसाठी सर्वात जास्त तरतूद करण्यात आली आहे. 2014 पासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात जवळपास साडेबारा हजार कोटी रेल्वेसाठी तरतूद केल्याचे दिसून येते.  अपूर्ण आणि प्रलंबित असलेले प्रकल्प  पूर्ण करण्याच्या अनुषंगाने रेल्वे  विभाग कार्यरत आहे. 

  महाराष्ट्रामध्ये रेल्वेची कामे  प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक रेल्वेचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झालेले आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत ते 100 टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न रेल्वे विभाचा आहे, असेही यावेळी श्री. दानवे म्हणाले.

  सोलापूर ते धाराशिव  हा 84 किमीचा रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही यावेळी श्री.दानवे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

रेल्वेसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, त्यांना भूसंपादनाचा योग्य तो मोबदला नक्कीच मिळेल, असेही यावेळी रेल्वे राज्यमंत्री श्री.दानवे म्हणाले.

 यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, जालना जिल्ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुच्छे, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन राजकुमार माने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ‍रविंद्र माने तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे,  तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

From around the web