उस्मानाबाद जिल्ह्यात ८ ते १३ मे पर्यंत जनता कर्फ्यू
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने दि. ८ मे ( शनिवार ) ते १३ मे ( गुरुवार ) असे सलग सहा दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तसा आदेश काढला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रस्त्यांवरील वाढणारी गर्दी, यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून, शनिवारपासून (दि.८) १३ मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची किराणा दुकाने, भाजीपाला व दूध विक्री दुकानांसह सर्व प्रकारची बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारच्या बँकांचेही व्यवहार बंद असणार आहेत तर अत्यावश्यक सेवेतील सरकारी कार्यालये, दवाखाने, औषध विक्रीची दुकाने या काळात सुरू राहतील.
शनिवारपासून पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात अाला असून, यामध्ये केवळ रूग्णालये, औषध दुकाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये,चष्मा दुकाने, आरोग्य सेवा आणि त्यांची उत्पादने,सॅनिटायझर, मास्क विक्री, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक प्रवासी वाहतूक, महामार्गावरील पेट्रोलपंप सुरू राहील.
पालकमंत्री गडाख, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे या लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला असला तरी या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी पोलिसांच्या माध्यमातून होण्याची गरज आहे. अनावश्क कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाया कराव्यात, तरच रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उस्मानाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि मृत्यूदर वाढल्याने शहरात कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली होती. कडक लॉकडाऊनमध्ये मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली होती.
जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तसेच संघटनांनी देखील कडक लॉकडाऊनची मागणी केली होती, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे.
मेडिकल, दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
काय आहे आदेश ?