लॉकडाऊनच्या मार्गदर्शन सूचनांमध्ये बदल करुन काही आस्थापनांचा अत्यावश्यक सेवेत समावेश

 
लॉकडाऊनच्या मार्गदर्शन सूचनांमध्ये बदल करुन काही आस्थापनांचा अत्यावश्यक सेवेत समावेश

उस्मानाबाद - राज्यात शासनाने 4 एप्रिल-2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेल्या लॉकडाऊन संदर्भातील दिलेल्या सूचनांमध्ये वाढ करुन नवीन वाढीव मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार काही आस्थापनांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना,अधिकाऱ्यांना काही अटी शर्तींच्या अधिन राहून लॉकडाऊन काळात संचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

     पेट्रोल पंप व पेट्रोलियम संबंधित उत्पादने यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश झाला 5 एप्रिल-2021 च्या आदेशानुसार करण्या आला आहे.त्यामुळे न.प./न.पा./न.पं. हद्दीतील पेट्रोल पंपांकरिता लागू करण्यात आलेला नियम रद्द करण्यात आले आहेत.सर्व माल वाहतूक डाटा सेंटर सेवा,(Data Centers)Cloud Service Providers/ IT services supporting critical infrastructure and services. शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा (Security Services). फळ विक्रेते यांचा 13 मार्च 2020 च्या आदेशात समावेश केला आहे.

      पुढील खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घेण्याच्या आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोरोना निगेटिव्ह असल्याबाबतचे 15 दिवसांपर्यंत वैध असलेले आरटीपीसीआर/अँटीजेन प्रमाणपत्र सोबत बाळगण्याच्या अटीवर या संस्था सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 य वेळेमध्ये चालू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. आवश्यक प्रमाणपत्र सोबत नसल्यास संबंधितास 1000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. सेबी (SEBI) व त्यांची कार्यालये (stock exchanges, depositories and clearing corporations and intermediaries registered with SEBI) RBI द्वारे नियंत्रित केल्या जाणा-या संस्था आणि मध्यस्थी करणा-या संस्था (intermediaries including standalone primary dealers, CCIL, NPCI, payment system operators) आणि RBI द्वारे नियंत्रित केल्या जाणा-या बाजारांमध्ये काम करणारे सर्व आर्थिक बाजारातील भागीदार.सर्व बँकींग सेवा न देणा-या वित्तीय संस्था (All Non-Banking Financial Corporations).सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (All Micro Finance Institutions).विधीज्ञांची कार्यालये (Offices of Advocates).लस (Vaccines)/जीवनावश्यक औषधे (lifesaving drugs)/औषधी उत्पादने (Pharmaceutical products) यांच्याशी संबंधित असणारे परवानाधारक वाहतूकदार (Licensed Multi Modal Transport Operators) व कस्टम हाऊस एजंट्स यांच्यासाठी आहे.

     सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 व शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या वेळेमध्ये येणा-या,जाणा-या रेल्वे,बस,विमाने यांमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना रेल्वेस्थानक,बस स्थानक,विमानतळ याठिकाणी किंवा तेथून त्यांचे घराकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे असणा-या वैध टिकिटाच्या आधारावर संचार,प्रवास करण्याची परवानगी राहील.

उद्योगांमध्ये काम करणारे जे कामगार सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 व शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या वेळेमध्ये खाजगी बस,खाजगी वाहनाने कामावर जात असतील तर त्यांना त्यांच्याकडील ओळखपत्राच्या आधारावर संचार/प्रवास करण्याची परवानगी राहील.

    धार्मिक स्थळे,प्रार्थनास्थळे सद्यस्थितीत भाविकांसाठी बंद करण्यात आलेली आहेत. केवळ धार्मिक स्थळे,प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनामधील संबंधित व्यक्तींना नित्य पुजा, दिवाबत्ती, साफसफाई करण्याची परवानगी आहे. एखाद्या प्रसंगी कोणतेही विवाह,अंत्यविधी विषयक कार्यक्रम धार्मिक स्थळे,प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी असल्यास या कार्यालयाचे दि. 05 एप्रिल 2021 मध्ये नमूद विवाह,अंत्याविधी विषयक कार्यक्रमांकरिता निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येईल.

     ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरीता प्रत्यक्षपणे संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रावर व तेथून घरी जाण्याकरिता त्यांच्याकडील वैध परीक्षा प्रवेशपत्राच्या आधारे सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 व शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या वेळेमध्ये संचार,प्रवास करण्याची परवानगी राहील.जे विवाहसमारंभ शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या वेळेमध्ये निश्चित करण्यात आलेले असतील त्यांना स्थानिक परिस्थितीचा विचार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दि. 05 एप्रिल 2021 मध्ये नमूद विवाह,अंत्यायात्रा विषयक कार्यक्रमांकरिता निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्याचे अधिकार Incident Commander तथा तहसीलदार यांना राहतील.स्थानिक परिस्थितीचा विचार करुन घरगुती मदतनीस,वाहनचालक,स्वयंपाकी यांना सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 व शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या वेळेमध्ये काम करण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार Incident Commander तथा तहसीलदार यांना राहतील.

       या आदेशाची अंमलबजावणी दि.05 एप्रिल-2021 रोजी रात्री 08.00 पासून तात्काळ लागू करण्यात आली आहे. हेआदेश दि.30 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.

                                              
 

From around the web