उस्मानाबाद तालुक्यात मुसळधार पाऊस (Video)

इंडिका कार सह दोन मोटारसायकल गेल्या वाहून गेल्या...  
 
s
एक तरुण बेपत्ता

उस्मानाबाद  - तालुक्यातील समुद्रवाणी, मेंढा, लासोना, सांगवी, कामेगाव बोरगाव बोरखडा टाकळी कनगरा आदी गावात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे.

या पावसामुळे तेरणा आणि सवळा नदी संगम, दोन्ही नद्या काठोकाठ वाहू लागल्या आहेत.बोरखेडा गावालगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून एक मोटारसायकल वाहून गेली असून एक युवक बेपत्ता आहे.तसेच मेंढा गावाजवळ एक इंडिका कार वाहून गेली आहे.तसेच मेंढा गावात अनेक घरात पाणी शिरलं आहे.

तरुण  बेपत्ता 

उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील  समीर ईनुस शेख  (वय २८) हा तरुण उस्मानाबाद येथील आपले काम उरकून मोटर सायकल वरून कनगरा गावी परतत  आहे, तेव्हा बोरखेडा गावालगत असलेल्या ओढ्या वरील पुलावरून मोटारसायकल सह वाहून गेला आहे, अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. 

 मेंढा येथील गोवर्धन ढोरमारे आणि बाबा कांबळे हे आपल्या इंडिका कारमधून समुद्रवाणी वरून मेंढा गावी जात असताना समुद्रवाणी गावालगत असलेल्या ओढ्यावरून त्याची ही इंडिका कार पाण्यात वाहून गेली, येथील  नागरिकांच्या सतर्कते मुळे त्यांना वाहत्या पाण्यातून काढण्यात यश आले आहे. तर पाडोळी येथील अजित बोचरे शेताकडून गावाकडे येत असताना त्यांची मोटरसायकल एका कालव्यात वाहून गेली आहे,सुखरूप ते यात बचावले आहेत.

From around the web