दोन हजार लाचेची मागणी केल्याने तुळजापूर तालुक्यातील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात 

 
दोन हजार लाचेची मागणी केल्याने तुळजापूर तालुक्यातील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

तुळजापूर -  बिलाचा धनादेश देण्यासाठी  दोन हजार लाचेची  मागणी केल्याने तुळजापूर तालुक्यातील एक ग्रामसेवक एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. मनोज शिवाजी अकोसकर ( दिंडेगाव ता. तुळजापूर ) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. 

तक्रारदार यांच्या पत्नी दिंडेगाव ता.तुळजापूर येथील  ग्रामपंचायत सदस्य असताना तक्रारदार यांनी ग्रामपंचायत मार्फतीने सन 2019- 2020 या वित्तीय वर्षात अनुसूचित जाती व  नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास कामे अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम केले होते.त्या कामाच्या बिलाचा 1,88,160/- रुपयांचा चेक तक्रारदार यांना देण्यासाठी  लोकसेवक  मनोज शिवाजी अकोसकर , वय 33 वर्षे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय दिंडेगाव ता. तुळजापूर ज़ि. उस्मानाबाद  यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे वरिष्ठाना देणे साठी पंचांसमक्ष  2000/- रुपये लाच रकमेची  मागणी केल्याचे आढळून आल्याने याबाबत  पो स्टे तुळजापूर , ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

आरोपी मनोज शिवाजी अकोसकर यास ताब्यात घेण्यात आले आहे.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र.वि. उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव,विष्णू बेळे, विशाल डोके व  चालक इरफान पठाण यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.95279 43100) यांनी केले आहे.

From around the web