गुड न्यूज :  तेरणा धरण ओव्हरफ्लो   Video 

 
s

उस्मानाबाद - तेरणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे  'तेरणा'  तुडुंब भरून ओव्हरफ्लो  झाला आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरासह चार गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. 

उस्मानाबाद शहरासह  येडशी, तडवळा,  तेर ढोकी चार या गावांना तेरणा मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे  तेरणा प्रकल्प  १०० टक्के भरला असून सर्व दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

तेरणा मध्यम प्रकल्प गुरुवारी ( दुपारी पूर्ण क्षमतेने भरले आणि दुपारनंतर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  सलग दुसऱ्या वर्षी भरलेल्या धरणाचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

 गतवर्षी तेरणा धरणा सप्टेंबर महिन्यातच परतीच्या पावसाने पूर्णपणे भरले होते. तेर, ढोकी, येडशी, तडवळा या चार गावची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या बंद असल्याने धरणात जूनच्या प्रारंभी ३८ टक्के पाणी होते. परंतू,जून महिन्यात पडलेल्या पावसाने जूनअखेर ४१ टक्के पाणी धरणात जमा झाले होते.उस्मानाबाद शहरासाठी दररोज २५ ते ३० लाख लिटर पाणी उचलले जाते.त्याशिवाय गोवर्धनवाडी, कावळेवाडी, मुळेवाडी, थोडसरवाडी या लहान गावांच्या पाणीपुरवठा योजना याच धरणातील पाण्यावर सुरू आहेत. 

पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तरी धरण भरते की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, सप्टेंबरमध्येच तेरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होऊन गुरूवारी धरण भरून ओंसडून वाहू लागले आहे.दरम्यान, नदीकाठच्या गावांनी काळजी घ्यावी, असे अावाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात अाले अाहे.

७ वेळा भरले धरण

२००६,२००८ व २०१०, २०१६, २०१७, २०२० व आता २०२१ साली तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. हे विहंगम दृश्य पहाण्यासाठी नागरीकांची गर्दी वाढत असून  प्रशासनाने नदीकाठच्या गाव ग्रामपंचायतींना नोटीसा देऊन शेतकरी व नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .

From around the web