उस्मानाबाद जिल्हयातील सर्व रुग्णालयांची अग्नी व विद्युत  सुरक्षा तपासणी करुन अहवाल तात्काळ द्या

   - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
 
उस्मानाबाद जिल्हयातील सर्व रुग्णालयांची अग्नी व विद्युत सुरक्षा तपासणी करुन अहवाल तात्काळ द्या

उस्मानाबाद - राज्यातील काही ठिकाणी रुग्णालयांमध्ये आग लागून जिवित आणि वित्त हानी झाल्यामुळे जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालयांचे अग्नी सुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण आणि विद्युत सुरक्षेची तपासणी तात्काळ करुन अनुपालन अहवाल देण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत घेण्यात आली आहे.या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश जारी केले आहेत.

      दरम्यान,जिल्हयातील सर्व कोविड केअर सेंटर(CCC), डेडिकेटेड कोविड सेंटर (DCHC),डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल(DCH) या ठिकाणी अग्नीशामक यंत्र (fire Exintinguishre) बसविण्यात यावेत,असे आदेश देण्यात आले आहेत.त्याचबरोबर जिल्हयातील सर्व रुग्णालयातील अग्नीसुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण आणि विद्युत सुरक्षेची तपासणी तात्काळ करण्यात करण्याचे आदेश दि.11 एप्रिल-2021 रोजी आदेश जारी केले आहेत.या सर्व ठिकाणी वीज पडून जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून वीजरोधक यंत्र (Lightingng Arrester) बसवून घ्यावेत.असेही  आदेश देण्यात आले आहेत.तसेच कोठेही आग लागलीच तर इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी बाहेर पडण्याचे मार्ग (Fire Exit Route) दर्शविणारे फलक बसविण्यात सांगण्यात आले आहे.

        सध्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये मोठया प्रमाणावर ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला जात आहे.ऑक्सिजन हा वायू अग्नीच्या सानिघ्यात आल्यास त्याची दाहकता कित्येक पटीने वाढवते.त्यामुळे ऑक्सिजनचा साठा आणि वापर होत असलेल्या ठिकाणी पुरेसे अग्नी प्रतिरोधक यंत्र (Fire Extinguisher) बसविण्यात यावेत.तसेच वाळुच्या बकेट आणि पाण्याचे नळ उपलब्ध ठेवावेत.ऑक्सिजनच्या पाईप लाईनच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी करुन वॉर्डातील जोडण्या तपासाव्यात,कुठे गळती होत असल्यास तात्काळ दुरुस्ती करावी,जुनी पाईपलाईन धोकादायक असेल तर नवीन बसवून घ्यावी,आदी उपाय योजना तात्काळ करण्यात याव्यात,असेही या आदेशात म्हटले आहे.ऑक्सिजनमुळे कुठेही दुर्घटना घडणार नाही यासाठी अवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

       जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सक्षम प्राधिकऱ्यांमार्फत जिल्हयातील खाजगी रुग्णालयांचे अग्नी सुरक्षा परिक्षण आणि विद्युत सुरक्षा तपासणी करुन घ्यावी.रुग्णालयात त्रुटी आढळून येतील त्या अनुषंगाने उपाय योजना करुन त्याबाबतचा स्वयं स्पष्ट अहवाल विनाविलंब जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा,असेही या आदेशात म्हटले आहे.
                             

From around the web