कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - मानवी जिवीतास, रहदारीस धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या, कोविड- 19 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जारी केलेले विविध मनाई आदेश झुगारुन दुकान- हॉटेल व्यवसायासाठी चालू ठेवणाऱ्यांवर  उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी संबंधीत पो. ठा. येथे 05 एप्रील रोजी खालील प्रमाणे गुन्हे दाखल केले.

 शिराढोण: ताहेर मदार यांनी 04 एप्रील रोजी 20.30 वा. दाबा फाटा येथे तर मनोज आपटे यांनी आव्हाड शिवपुरा येथे आपली दुकाने व्यवसायास चालू ठेवुन  कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 उल्लंघन केले.

 आंबी : सतिश कदम व राम सातपुते रा.आंबी ता.परंडा यांनी 05 एप्रील रोजी 11.00 वा. आंबी येथे मनाई आदेशांचे उल्लंघन करुन दुकाने व्यवसायास चालू ठेवुन  कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

उस्मानाबाद -  विमल हुलगे, रा. उस्मानाबाद  यांनी 05 एप्रील रोजी 11.00 वा. मनाई आदेशांचे उल्लंघन करुन नगर पालिका मुख्यालया समोर चहा हातगाडी  व्यवसायास चालू ठेवुन  कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

मारहाण

भूम ;  कल्याण चोरगे, रा. वाल्हा हे  27 /3/2021 रोजी 14.00 वाजता शेतातील सामाईक शेत विहीरीचा पंप चालु करण्यास गेले होते. यावेळी जुन्या वादातुन गावकरी गोपाळ व मिना चोरगे यांनी कल्याण यांना शिवीगाळ करुन लाकडी फळीने मारहाण केली. अशा मजकुराच्या कल्याण चोरगे यांनी वैद्रयकीय उपचारा दरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 325, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण: संतोष बोंदर, रा. वडगाव (शी) हे दि. 5/4/2021 रोजी 09.00 वाजता आई सुमन व पुतण्या विजय यासह घरासमोर होते. यावेळी जागे संबंधी जुन्या वादातुन भाउबंद अतुल, जनक, संजय, राजाभाउ, जयपाल, दत्ता, प्रकाश यांनी संतोष,सुमन, विजय  यांना  शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी  मारहाण केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323,324,143,147,149,188,269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web