कोरोना : लागोपाठ तिसऱ्या दिवशी दोन रुग्णाचा मृत्यू  

उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्णाची संख्या कमी झाली पण मृत्यू दर जास्त
 
कोरोना : लागोपाठ तिसऱ्या दिवशी दोन रुग्णाचा मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात लागोपाठ तिसऱ्या दिवशी ( सोमवार ) कोरोनामुळे दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी असली तरी मृत्यू दर जास्त आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार  दि. ३० नोव्हेंबर रोजी नव्या २२ रुग्णाची नोंद झाली तर ३९  जण बरे होवून घरी परतले. ही  नोंद फक्त शासकीय असून, खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची नोंद नाही तसेच होम कॉरंटाईन झालेल्या रुग्णाची नोंद नाही. 

 
गेल्या २४ तासात कळंब शहरातील एका 72 वर्षीय तसेच उस्मानाबाद शहरातील एका ७० वर्षाच्या वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने ५७१ रुग्णाचा बळी घेतला आहे. 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ७४९  रुग्ण आढळून आले असून, पैकी १४ हजार ८९३   रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या २८५  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

From around the web