कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात १३ एप्रिल रोजी ५९० पॉजिटीव्ह, सात मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ४९४०
Apr 13, 2021, 21:38 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज १३ एप्रिल ( मंगळवार ) रोजी तब्बल ५९० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात सातकोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४९४० झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ४६७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २० हजार ८८४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६४३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.