कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ मे रोजी ४०६  पॉजिटीव्ह, ६ मृत्यू 

उस्मानाबाद जिल्हा रेड झोन मध्ये 
 
corona
कोरोना रुग्ण बरे होण्याचे ८९.६२  टक्के तर ‌मृत्यूचे २.२५ प्रमाण टक्के

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २४  मे ( सोमवार) रोजी तब्बल ४०६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५६६  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ६ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली आहे पण मृत्युदर कायम आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५२ हजार ७७५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४७ हजार २९७  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११८८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४२९० झाली आहे .

राज्यातील रेड झोन असलेले जिल्हे 

राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची  बैठक बोलावली होती.  बुलढाणा (Buldhana), कोल्हापूर(kolhapur), रत्नागिरी(Ratnagiri), सांगली(sangli), यवतमाळ(yavatmal), अमरावती(amravati), सिंधुदुर्ग(Sindhudurga), सोलापूर(Solapur), अकोला(Akola),सातारा (Satara), वाशीम (Washim), बीड (Beed), गडचिरोली(Gadchiroli), अहमदनगर (Ahemdnagar), उस्मानाबाद (Osmanabad) या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे. 

From around the web