पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कोरोना बैठकीतून  भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा 'वॉकआऊट' 

 
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कोरोना बैठकीतून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा 'वॉकआऊट'

अखेर पालकमंत्री शंकरराव गडाख आज उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात बैठक सुरू असताना भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बैठकीतून अचानक  'वॉकआऊट ' केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पालकमंत्री शंकरराव गडाख २६ जानेवारीनंतर उस्मानाबादला आले नव्हते, उस्मानाबाद लाइव्हने त्याचा समाचार घेतल्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील पत्रक काढून पालकमंत्र्यावर घणाघाती टीका केली होती. 

सोमवारी सकाळी पालकमंत्री शंकरराव गडाख उस्मानाबादेत दाखल झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीस  खासदार ओमराजे निंबाळकर, आ. राणा जगजितसिंह पाटील , आ. कैलास  पाटील, आ. ज्ञानराज चौगुले , जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते. 

 बैठक सुरू असताना १५ मिनिटानंतर आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी बैठकीतून अचानक  'वॉकआऊट ' केला होता. याबाबत आ. राणा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.  एका  स्वीय सहाय्यकाने सांगितले की,यशवंत मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सतीश दंडनाईक यांचे ते वडील ऍड  सत्यनारायण (आबा) दंडनाईक यांचें निधन झाल्याने ते  सतीश दंडनाईक  यांच्या घरी जाण्यासाठी निघून गेले तसेच त्यांनी आपले सर्व म्हणणे मांडले होते. 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र  'वॉकआऊट' प्रकरणी टीकेची झोड उठवली आहे. लाज वाटू द्या, म्हणणाऱ्या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना  बैठकीतून अचानक  'वॉकआऊट ' करताना लाज कशी वाटली नाही, अशी टीका काही कार्यकर्त्यांनी केली आहे.  

 डॉ.साहेबांचे स्नेही व आमच्या अत्यंत जवळच्या कुटुंबातील सदस्य यांचे निधन झाल्यामुळे अंतिम दर्शना साठी मला जावे लागले. माझे मुद्दे मांडून झाल्यानंतर पालकमंत्री महोदयांना कल्पना देऊन मी बैठकीतून निघालो. या मध्ये कोणीही गैरसमज करून घेऊ नयेत अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये "

 - आ.राणाजगजितसिंहजी पाटील

From around the web